टाटा, फौंड्रीचे युनिफॉर्म्स सोलापुरातून

Uniform
Uniform

सोलापूर - ‘युनिफॉर्म हब’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोलापुरात सरकारच्या सर्व शिक्षा अभियानांतर्गत शालेय गणवेशाची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. जानेवारी ते ऑगस्टपर्यंत शालेय गणवेशाची कामे सुरू असतात. त्यानंतर चार महिने येथील गारमेंटमध्ये कॉर्पोरेट कंपन्यांच्या युनिफॉर्मची कामेही सुरू असतात. त्यात देशातील नामवंत कंपनी असलेल्या टाटाच्या विविध वर्कशॉप, ऑफिस व प्लांटमधील कर्मचाऱ्यांचे युनिफॉर्म तयार होत आहेत. त्याचबरोबर इतर कॉर्पोरेट कंपन्या, हॉस्पिटल, केटरिंग, फौंड्रीमधील कर्मचाऱ्यांसाठी विविध प्रकारचे युनिफॉर्म तयार केले जात आहेत. त्यामुळे पूर्वी शालेय गणवेशासाठी आठ महिने काम चालायचे. आता बारा महिने कामे मिळत असल्याने कामगारांना चांगला रोजगार प्राप्त होत आहे.

सोलापूर रेडिमेड गारमेंट असोसिएशनचे संचालक सतीश पवार यांच्या गारमेंट फॅक्‍टरीत टाटाच्या विविध विभागांतील कर्मचाऱ्यांचे युनिफॉर्म तयार होत आहेत. टाटाच्या युनिफॉर्म पुरवठादारांकडून सोलापूरला ऑर्डरी मिळत आहेत. त्यात स्टाफ, वर्कवेअर, ऑफिसवेअर, शिकाऊ कर्मचाऱ्यांसाठीच्या युनिफॉर्मचा समावेश आहे. टाटासारख्या देशातील नामांकित कंपनीसाठीचे युनिफॉर्म सोलापुरात तयार होत असल्याने, पुढील काळात इतर नामांकित कंपन्यांच्या युनिफॉर्मची कामे मिळून गारमेंट उद्योगाची भरभराट होण्याचे हे संकेत आहेत. याचबरोबर पुणे, मुंबई येथील पुरवठादारांकडून सोलापूरला पसंती मिळत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com