सोलापूरसाठी आंबेडकरांना आग्रह धरणार - तौफिक शेख

विजयकुमार सोनवणे
गुरुवार, 29 नोव्हेंबर 2018

सोलापूर - सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी वंचित आघाडीतर्फे प्रकाश आंबेडकर यांच्या उमेदवारीसाठी आग्रह धरणार असल्याचे एमआयएमचे शहराध्यक्ष तौफिक शेख यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर एमआयएमचे संस्थापक खासदार ऍड. असोसिद्दीन ओवेसी यांचा डिसेंबर अखेर दौरा होणार असल्याचे ते म्हणाले. 

सोलापूर लोकसभा आणि जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर श्री. शेख यांनी "सकाळ'शी संवाद साधला. ते म्हणाले, "लोकसभेसाठी भाजपमध्ये इच्छुकांची गर्दी आहे. त्यामुळे उमेदवार ठरवताना त्यांच्या श्रेष्ठींना फार विचार करावा लागणार आहे. काँग्रेसबाबत लोकांत अजूनही नाराजी आहे. ऍड. आंबेडकर यांनी बहुजन व वंचितांना एकत्रित आणण्याचे महत्त्वाचे काम केले आहे. त्यामुळे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील दलित, मुस्लिम आणि ऍड. आंबेडकर यांना मानणाऱ्या वर्गाचा मोठा पाठिंबा बहुजन वंचित आघाडीला मिळेल व त्याचा फायदा होईल.'' 

गेल्या विधानसभा निवडणुकीत एमआयएमतर्फे चार मतदार संघात निवडणूक लढविली होती. यंदा वंचित बहुजन आघाडी सोबत असल्याने जास्तीत जास्त जागांवर आघाडी पुरस्कृत एमआयएमचे उमेदवार असतील यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहेत. शहर मध्य मधून मी स्वतः इच्छुक आहे. गेल्या निवडणुकीत मिळालेली मते पाहता, यंदाही मतदार आमच्यावर विश्‍वास दाखवतील याची खात्री आहे, असा दावाही श्री. शेख यांनी केला. 

ऍड. आंबेडकर यांनी सोलापुरातून उभे रहावे यासाठी त्यांच्याशी स्वतंत्रपणे संपर्क साधला आहे. एमआयएमचे संस्थापक ऍड. ओवेसी यांच्याकडे आम्ही तसा आग्रह धरणार आहोत. ऍड. आंबेडकर उमेदवार असतील तर सोलापूर लोकसभा मतदार संघात परिवर्तन अटळ आहे. 
- तौफिक शेख, शहराध्यक्ष एमआयएम, सोलापूर 

Web Title: Tawfee Shaikh will insist on Ambedkar for Solapur