करचुकव्यांना चाप; सामान्यांना दिलासा - फडणवीस

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 नोव्हेंबर 2016

तासगाव - 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्मार्ट सिटीची विकासगंगा प्रत्यक्षात आणण्यासाठी राज्यातील नगरपालिकांची सत्ता द्या, निधी कमी पडू दिला जाणार नाही. राज्यातील गरिबांना 2017 पर्यंत घरे देण्यात येतील, नगरपालिकांच्या करचुकवेगिरीला चाप लावून महसूलवाढीसह सर्वसामान्यांवरील कराचा बोजा कमी करू,'' असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी येथे केले.

तासगाव नगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षातर्फे आयोजित प्रचार सभेत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, '2011 च्या जनगणनेनुसार राज्यातील 11.20 कोटींपैकी 5.5 कोटी लोक 300 शहरांत राहतात अशी आकडेवारी आहे. शहरीकरण वाढल्यानेच पंतप्रधान मोदी यांनी स्मार्ट सिटी, 14 वा वित्त आयोग, अमृतवेल अशा योजनांना गती दिली. स्वच्छ भारत अभियानाला महत्त्व दिले आहे. आम्ही सत्तेवर आलो तेव्हा यातील एकही शहर हागणदारीमुक्त नव्हते. दोन वर्षांत 100 शहरे हागणदारीमुक्त केली.

2017 पर्यंत सर्व शहरे हागणदारीमुक्त करणार आहे. राज्य सरकार 2017 पर्यंतच सर्वांना घरे देणार आहे. पालिकांचे 140 प्रकल्प निधीअभावी रखडले होते. पुणे विभागात 32 योजना रखडल्या होत्या. त्या सगळ्या योजना मार्च 2017 पर्यंत पूर्ण होणार आहेत. त्यासाठी आठ हजार कोटींचा निधी दिला आहे.'' पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार संजय पाटील यांचीही भाषणे झाली.

पालिकांतील चिरीमिरी बंद करू
मुख्यमंत्री म्हणाले, 'नगरपालिकांच्या विकासाला निधी देत असताना कुठेही चिरीमिरीला वाव असणार नाही. पालिकांमध्ये ई-निविदा पद्धतीनेच कामे होतील. ई-गव्हर्नन्स सुरू करत आहोत. पारदर्शी, गुणवत्तापूर्ण आणि गतिमान कामे होतील. कामाचा दर्जा ठरविण्यासाठी "थर्ड पार्टी ऑडिट' केले जाईल. महिन्यात निविदा, 100 दिवसांत मंजुरी आणि निर्धारित वेळेत काम, वाढीव डीएसआरला मान्यता मिळणार नाही. 270 सेवा ऑनलाइनमुळे कामांसाठी चकरा मारायची गरज पडणार नाही. नकाशेही उपलब्ध करून दिले जातील.'

Web Title: Tax evaders pressure; common comfort