'चाचा नेहरूंनी जागा दिली; टॅक्‍स मागायचा नाही' 

Solapur Municipal Corporation
Solapur Municipal Corporation

सोलापूर : "आम्हाला चाचा नेहरूंनी (पंडित नेहरू) फुकट जागा दिली आहे, त्यामुळे कोणत्याही प्रकारचा टॅक्‍स मागायचा नाही, चालायला लागा...'' असा धमकीवजा इशारा मिळाल्यामुळे रामवाडी परिसरातून महापालिका कर वसुली पथकातील कर्मचारी रिकाम्या हाताने परतले. पंडित नेहरू यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला हा अनुभव आल्याने कर्मचारी चांगलेच बावरून गेले होते. 

रामवाडी परिसरात सेटलमेंट आहे. तारेच्या कुंपणातून मुक्त झाल्यावर काही महिन्यांनी तत्कालीन पंतप्रधान नेहरू यांच्या उपस्थितीत या ठिकाणी कार्यक्रम झाला होता. त्या वेळी येथील रहिवाशांना मोफत जागा दिली होती. जागा मोफत मिळाली, पण पाणीपट्टी आणि मिळकत कर देणे आवश्‍यक आहे. मात्र, महापालिका स्थापनेपासून किंवा त्यापूर्वीही या भागातून कोणत्याही प्रकारचा कर वसूल केला गेला नाही. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बांधकामे झाली आहेत, मात्र बहुतांश बांधकामांची नोंदणी नाही, परवानेही घेतले गेले आहेत की नाही याबाबत साशंकता आहे. या परिसरात सुमारे 500 ते 550 मिळकती आहेत. पैकी 50 ते 55 मिळकतींची नोंद असावी, असा अंदाज आहे. 

या भागात कर वसूल करण्यास गेलेल्या कर्मचाऱ्याला आतापर्यंत काहीच वसुली करता आली नाही. कर्मचारी गेला की त्याच्या अंगावर धावून येणे किंवा नेहरूंचा दाखला देणे असे प्रकार होतात. त्यामुळे महापालिकेचे कोणतेही कर्मचारी या भागात वसुलीसाठी जाण्यास धजावत नाहीत. मंगळवारी वसुलीचे पथक वसुलीसाठी गेले, त्यावेळीही असाच अनुभव आला. त्यामुळे कोणत्याही प्रकारची वसुली न करता हे पथक रिकाम्या हाताने परतले. 

रामवाडी सेटलमेंट परिसरातील बहुतांश मिळकतींची नोंदणी नाही. कर वसुलीही होत नाही. कर्मचाऱ्यांना संकटांना सामोरे जावे लागते. त्यामुळे आयुक्त दिल्लीहून परतल्यावर या संदर्भात धोरण ठरविण्यात येईल. 
- आर. पी. गायकवाड, कर संकलन व कर आकारणी प्रमुख 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com