भाजप सरकारला धडा शिकवा - विश्‍वजित कदम

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 फेब्रुवारी 2017

जत - अडीच वर्षांत केंद्र व राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने आश्‍वासने व स्वप्ने दाखविली. ती धुळीस मिळाली आहेत. जिल्ह्याच्या विकासासाठी कॉंग्रेस कटिबद्ध आहे. 21 फेब्रुवारीला भाजपला मतपेटीद्वारे धडा शिकवा, असे आवाहन युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्‍वजित कदम यांनी केले. उमदी, उटगी व बनाळी येथे कॉंग्रेसच्या प्रचारार्थ जाहीर सभेत ते बोलत होते. 

श्री. कदम म्हणाले, ""काळा पैसा बाहेर काढणार, भ्रष्टाचारमुक्‍त भारत, महागाई कमी करणे, रोजगार देणे, दहशतवादाविरुद्ध लढाई यात भाजपने भ्रमनिरास केला. जतचे आमदार पंचायत समितीत बसून "रोहयो' भ्रष्टाचाराला खतपाणी घालतात. तेच डॉ. कदम यांच्यावर टीका करतात. प्रत्यक्षात आमदार जगताप यांनी पिठाची गिरणी तरी काढली आहे का? आमदार जगताप कर्तव्यशून्य आहेत. त्यांच्यामागे न जाता कॉंग्रेसला साथ द्या.'' 

पाणी संघर्ष समितीचे निवृत्ती शिंदे यांनी कार्यकर्त्यांसह कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांचा सत्कार श्री. कदम यांच्या हस्ते झाला. त्यावेळी तालुक्‍याचे नेते विक्रम सावंत, जनसुराज्यचे बसवराज पाटील, निवृत्ती शिंदे, मानसिद्ध पुजारी यांनी मनोगत व्यक्‍त केले. भैया कुलकर्णी, परशुराम मोरे, योगेश व्हनमाने, मुन्ना पखाली, नीलेश बामणे आदी उपस्थित होते. 

लवंग्याला कारखाना 
विश्‍वजित कदम म्हणाले, ""जत तालुक्‍याच्या खास करून पूर्व भागाच्या विकासासाठी लवंगा येथे श्री दानम्मादेवीच्या नावाने साखर कारखाना सुरू करणार आहोत. जेणेकरून येथील हजारो बेरोजगारांच्या हाताला काम मिळेल.''

Web Title: Teach a lesson to BJP Government