शिक्षक मित्र ऍप शिक्षकांसाठी ठरणार लाभदायक 

मिलिंद देसाई
Wednesday, 2 September 2020

शिक्षण खात्याने शाळा कामकाजाचे संगणकीकरण करण्यास सुरुवात केली आहे.

बेळगाव : शिक्षण खात्याने शिक्षकांच्या मदतीसाठी शिक्षक मित्र हे मोबाईल ऍप सुरु केले आहे. या ऍपमुळे शिक्षकांना घरी बसल्या विविध प्रकारचे कामे करता येणार आहे. त्यामुळे शिक्षकांचा वेळ वाचणार असून अर्ज दाखल करण्यासह शिक्षण खात्याकडून जाहीर केली जाणारी माहिती देखील तातडीने शिक्षकांना मिळणार आहे. 

शिक्षण खात्याने शाळा कामकाजाचे संगणकीकरण करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे शिक्षकांना दररोज ऑनलाईनव्दारे शिक्षण खात्याला माहिती द्यावी लागते. यासाठी अनेकदा शिक्षकांना त्रास सहन करावा लागतो. परंतु. नवीन ऍप सुरु करण्यात आल्याने प्रत्येक शिक्षक आपले काम स्वत: करु शकतात. शिक्षकांना आपल्या मोबाईलव्दारे दिवसभरातील कोणत्याही वेळी बदली प्रक्रियेसह विविध प्रकारचे अर्ज ऍपव्दारे करता येणार असून अर्ज केल्यानंतर अर्ज मंजूर झाला आहे की नाही याची माहिती संदेशाव्दारे मिळणार आहे. तसेच शिक्षकांच्या सेवेचा तपशील देता येणार आहे. तसेच शिक्षकांना आपल्या शाळेतील शिक्षकांची कमतरता व इतर समस्याही मांडता येणार आहेत. त्यामुळे शिक्षक मित्र ऍप शिक्षकांसाठी फायदेशीर आहे. यासाठी शिक्षकांनी हे ऍप डाऊनलोड करुन घ्यावे असे आवाहन शिक्षण खात्याने केले आहे. 

हे पण वाचाकठीण परिस्थितीत या व्यवसायातून कमावले लाखो रूपये ; तब्बल साडेतीनशे कुटुंबे करतात हाच व्यवसाय

शिक्षक मित्र ऍपमुळे शिक्षकांना सर्व प्रकारची माहिती उपलब्ध होणार आहे. त्यामुळे शिक्षकांनी हे ऍप डाऊनलोड करुन घेणे आवश्‍यक आहे. याबाबत शिक्षकांना माहिती देण्यात आली आहे. 

-अण्णाप्पा पॅटी, शिक्षणाधिकारी 

मोबाईलमध्ये हे ऍप डाऊनलोड करुन घेतले आहे. ऍपचा शिक्षकांना चांगला उपयोग असून सर्व शिक्षकांनी हे ऍप डाऊनलोड करुन घ्यावे. येणाऱ्या काळात ऍपव्दारे अनेक प्रकारची माहिती मिळण्याची शक्‍यता आहे. 

-एकनाथ पाटील, अध्यक्ष माध्यमिक शिक्षक संघटना 

हे पण वाचाकोल्हापूरतील सर्व नाके हटवले पण गाव-प्रभाग समितीवर असणार ही महत्वाची जबाबदारी

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Teacher Friend App will be beneficial for teachers