शिक्षक समितीचे राज्यभर धरणे आंदोलन 

शिक्षक समितीचे राज्यभर धरणे आंदोलन 

सोलापूर - राज्यातील प्राथमिक शिक्षकांचे अनेक प्रश्‍न शासनस्तरावर प्रलंबित आहेत. त्या प्रश्‍नांच्या सोडवणुकीकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे येत्या शनिवारी (ता. 1) राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती सोलापूर जिल्हाध्यक्ष अनिल कादे यांनी दिली. 

शिक्षकांच्या प्रश्‍नांसंदर्भात अनेकदा प्रत्यक्ष भेटी घेतल्या आहेत. निवेदने दिली आहेत. विनंत्या केल्या आहेत. मात्र, शासनाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. शिक्षकांच्या प्रश्‍नांकडे लक्ष वेधण्यासाठी अधिवेशन काळात धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील एक नोव्हेंबर 2005 नंतर नियुक्त सर्व शिक्षक, कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, वरिष्ठ व निवड श्रेणीबाबतचा 23 ऑक्‍टोबर 2017 चा शालेय शिक्षण विभागाचा अन्यायकारक शासन निर्णय रद्द करावा या प्रमुख दोन मागण्यांसाठी हे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. राज्यातील शिक्षक समितीच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शनिवारी (ता. 1) दुपारी एक ते पाच या वेळेत धरणे आंदोलनाला उपस्थित राहण्याचे आवाहनही श्री. कादे यांनी केले आहे. शिक्षकांचा असलेला हक्क मिळविण्यासाठी एकजूट दाखवून या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन सोलापूर जिल्हा सरचिटणीस अमोगसिद्ध कोळी यांनी केले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com