शिक्षक संघाचा मोर्चा स्थगित

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 एप्रिल 2017

सोलापूर - ग्रामविकास विभागाने शिक्षकांच्या बदल्यांच्या संदर्भात काढलेल्या सरकारी निर्णयात दुरुस्ती करण्याची सकारात्मक भूमिका ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी घेतली. त्यामुळे शिक्षक संघाच्या वतीने बुधवारी (ता.26) राज्यभर काढण्यात येणारे मोर्चे स्थगित करण्यात आल्याची माहिती संघाचे जिल्हाध्यक्ष म. ज. मोरे यांनी दिली.

शिक्षकांच्या बदल्यांच्या संदर्भात 27 फेब्रुवारीला ग्रामविकास विभागाने आदेश काढला आहे. याविरोधात शिक्षक संघाने 26 एप्रिलला राज्यभर मोर्चा काढण्याचे नियोजन धुळे येथे झालेल्या बैठकीत केले होते. संघाच्या बदल्यांच्या प्रश्‍नाशिवाय इतर 15-16 मागण्या आहेत. या सगळ्या मागण्यांच्या बाबतीत ग्रामविकासमंत्री मुंडे यांच्याशी संघाच्या शिष्टमंडळाची सविस्तर चर्चा झाली. चर्चेत मुंडे यांनी सकारात्मक भूमिका घेतल्यामुळे उद्या (बुधवारी) होणारे मोर्चे स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

Web Title: teacher organisation rally stop