श्राद्धदिनी मित्रांमुळे ‘तो’ कर्जमुक्त

Raju-Satpute
Raju-Satpute

सुहृदांनी व्याजासह फेडले १४ लाख रुपये
सांगली - सलगरे येथील शिक्षक राजू सातपुते (वय ३२) यांचे गेल्या वर्षी हृदयविकाराच्या धक्‍क्‍याने निधन झाले. वृद्ध आई-वडील, पत्नी, सहा वर्षांचा मुलगा व तीन वर्षांची मुलगी असा संसार उघड्यावर पडला. त्यातच घरासाठी काढलेल्या १३ लाख ६८ हजार रुपयांच्या कर्जाचा डोंगर उभा होता. या परिस्थितीत सातपुते यांनी जोडलेले मित्र मदतीसाठी सरसावले. सातपुते कुटुंबाला कर्जमुक्त करूनच राजूचे वर्षश्राद्ध घालायचे असा निर्धार केला. राजू सातपुते यांच्या निधनाला बुधवारी (ता.२९) एक वर्ष होत आहे. मृत्यूनंतर ते कर्जमुक्त होईल. 

राजू सातपुते यांनी सलगरे (ता. मिरज) येथील शाळा क्र. एकमध्ये झाली. नऊ वर्षांच्या सेवेत आदर्श शिक्षक म्हणून ओळख निर्माण केली. शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना घडविताना त्यांनी घरच्या जबाबदाऱ्याही पार पाडल्या. बहिणीला घर बांधायला मदत केली. स्वत:ही घर बांधून त्याला ‘आई’ नाव दिले. सर्व काही सुरळीत सुरू असतानाच सातपुते यांचा हृदयविकाराच्या धक्‍क्‍याने २९ मे २०१८ रोजी मृत्यू झाला. त्यांच्या पत्नीवर संसाराचा गाडा हाकण्याची जबाबदारी आली. 

सातपुते यांनी जिल्हा मध्यवर्ती बॅंकेत कर्ज काढले होते. त्याला केवळ अपघाती मृत्यू झाला तरच विमा संरक्षण होते. अस्थि विसर्जनाच्या वेळी मित्रांना कर्जाची माहिती मिळाली. त्यांनी मदतीचा निर्धार केला. मित्रांनी ‘राजू सातपुते मदतनिधी’ नावाचा व्हॉट्‌सॲप ग्रुप करून मदत गोळा करण्यास सुरवात केली. विमा कंपनीने हात वर केले. मात्र, मित्रांनी शिक्षक, दानशूर मंडळी, राजकारणी आदींकडून मदत संकलित केली. मैत्रीच्या प्रेमापुढे कर्जाचा डोंगर थिटा पडला. उद्या सातपुते यांचे प्रथम पुण्यस्मरण आहे. या दिवशीच ते कर्जमुक्त होतील.

राजू गेल्यानंतर कुटुंबापुढे रुपयाचेही साधन नसल्याचे ऐकून धक्का बसला. त्यामुळे मदतीचा निर्धार केला. राजूच्या व्यक्तिमत्त्वाची उंची आम्हाला मदतनिधी गोळा करण्यास कामी आली. समाज अजूनही संवेदनशील असल्याची जाणीव झाली. पाचशेहून अधिकजणांनी आम्हाला मदत केली. अनेकांनी ऑनलाईन मदत केली. बुधवारी आमचा निर्धार पूर्ण होत असून राजूला श्रद्धांजली वाहिली जाईल.
- रमेश मगदूम, प्राथमिक शिक्षक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com