निपाणीत शालेय मुलीवर शिक्षकाचा बलात्कार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 जानेवारी 2017

निपाणी - अल्पवयीन शालेय मुलीवर एका शिक्षकाने वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक घटना निपाणीत शनिवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी अन्वरहुसेन हजरतअली नदाफ (वय 32) आणि रुकसाना अन्वरहुसेन नदाफ (वय 28, मूळ गाव ः नरगुंद, ता. गोकाक, सध्या रा. निपाणी) या दांपत्याला पत्नीला निपाणी पोलिसांनी अटक केली.

अन्वरहुसेन हा शहराबाहेरील शाळेत शिक्षक आहे. तो निपाणीत आपल्या पत्नीसह राहत आहे. पीडित मुलीच्या वडिलांचे निधन झाले होते. नराधम अन्वरहुसेन संबंधित मुलीवर वारंवार बलात्कार करीत होता. त्यासाठी पत्नी रुकसानावरही दबाव टाकत होता. त्यामुळे दोघांच्या संगनमताने मुलीवर अत्याचार सुरू होता. मुलीने नदाफने केलेल्या अत्याचाराची माहिती शिक्षण चालकांना दिली. त्यानंतर तिने बसवेश्वर चौक पोलिस स्थानकात याबद्दलची फिर्याद दिली. त्यानुसार अन्वरहुसेन व रुकसाना यांना पोलिसांनी अटक केली. शिवाय, त्यांच्याकडून गुन्ह्यांची कबुलीही घेतली.

संशयित शिक्षक दांपत्यावर कडक कारवाई व्हावी, या मागणीसाठी राज्य धनगर संघटना, हालमत संघटना, श्रीराम सेना, विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांसह नागरिकांनी शनिवारी दिवसभर पोलिस स्थानक आवारात गर्दी केली होती. अन्वरहुसेन दांपत्यावर गुन्हा दाखल करून त्यांना सायंकाळी संकेश्वर न्यायालयात हजर केले.

Web Title: teacher rape to girl student