दहावीच्या विद्यार्थिनीवर शिक्षकाचा बलात्कार 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 मे 2018

आश्‍वी (नगर) : पठार भागातील आश्रमशाळेच्या वसतिगृहात राहून दहावीत शिकणाऱ्या 17 वर्षीय आदिवासी विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याप्रकरणी घारगाव पोलिसांनी शिक्षकाला काल (ता. 27) रात्री अटक केली. जयराम बबन गोडे (वय 30) असे शिक्षकाचे नाव आहे. 

याबाबत पीडित विद्यार्थिनीने फिर्याद दिली. त्यानुसार संगमनेर तालुक्‍यातील आदिवासी ठाकर समाजातील ही मुलगी शिक्षणासाठी पहिलीपासून पठार भागातील आश्रमशाळेत राहत होती. दहावीत असताना विज्ञान शिक्षक जयराम गोडे याने तिची वारंवार छेड काढली. मात्र, भीतीपोटी तिने याबाबत कोणालाही माहिती दिली नाही. दहावीचा पेपर संपल्यानंतर 21 मार्च रोजी सायंकाळी शिक्षक गोडे याने तिला विज्ञान प्रकल्पाची फाइल घेऊन त्याच्या राहत्या घरी बोलाविले. घरी गेल्यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार केला. 

उन्हाळी सुटीसाठी पीडित मुलगी 22 मार्चला घरी गेली. आरोपी गोडे याने वारंवार तिच्या मोबाईलवर फोन करून झालेला प्रकार कोणाला न सांगण्याची धमकी दिली. हे कॉल मुलीने रेकॉर्ड केले. 

आरोपी गोडे याने दोन वेळा मुलीच्या घरी येऊन तिचे वडील व भावाशी गप्पा केल्या. त्याचा संशय आल्याने घरच्यांनी मुलीला विचारणा केल्यानंतर तिने झालेला प्रकार सांगितला. याबाबत फिर्याद दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपी गोडे यास तास, पिंपळदरी (ता. अकोले) येथे अटक केली. 

Web Title: teacher raped on 10th standard girl