शिक्षकांचे गुरुवारी तालुकास्तरावर समायोजन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 डिसेंबर 2016

सोलापूर - जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाचा यंदाचा सेवक संच मंजूर झाला आहे. सेवक संचामध्ये मंजूर झालेल्या व अतिरिक्त झालेल्या शिक्षकांचे तालुकास्तरावर गुरुवारी (ता. 15) तर 21 डिसेंबरला जिल्हास्तरावर समायोजन केले जाणार आहे. तालुकास्तरावरील समायोजनाची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश शिक्षणाधिकाऱ्यांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिला आहे.

सोलापूर - जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाचा यंदाचा सेवक संच मंजूर झाला आहे. सेवक संचामध्ये मंजूर झालेल्या व अतिरिक्त झालेल्या शिक्षकांचे तालुकास्तरावर गुरुवारी (ता. 15) तर 21 डिसेंबरला जिल्हास्तरावर समायोजन केले जाणार आहे. तालुकास्तरावरील समायोजनाची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश शिक्षणाधिकाऱ्यांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिला आहे.

यंदाच्या सेवक संचानुसार मुख्याध्यापक पद असलेल्या शाळा त्या पदास अपात्र ठरत असतील तर त्या शाळेतील मुख्याध्यापकांचे तालुक्‍यात रिक्त असलेल्या मुख्याध्यापकपदावर 15 डिसेंबरला समायोजन करावे. तसेच रिक्त जागेअभावी अपात्र शाळेतील मुख्याध्यापकांचे तालुक्‍यात समायोजन होत नसेल तर त्या मुख्याध्यापकांची यादी 15 डिसेंबरला खास दूतामार्फत प्राथमिक शिक्षण विभागास सादर करण्याच्या सूचना गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. ही यादी जिल्हा कार्यालयास सादर झाल्यानंतर त्या मुख्याध्यापकांचे 21 डिसेंबरला जिल्हास्तरावरून समायोजन केले जाणार आहे. तालुक्‍यामध्ये विषय शिक्षक अतिरिक्त होत असतील तर त्या-त्या तालुक्‍यात विषय शिक्षकांच्या रिक्त जागेवर त्यांचे 15 डिसेंबरला समायोजन करावे. 2013-14 च्या सेवक संचानुसार विषय शिक्षकांच्या रिक्त जागेवर उपशिक्षकांचे समायोजन केले आहे. जोपर्यंत विषय शिक्षकांच्या जागा भरल्या जात नाहीत तोपर्यंत त्यांचे समायोजन करण्यात येऊ नये. अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन उपशिक्षकांच्या रिक्त जागेवर 15 डिसेंबरला करावे. 18 मे 2011 च्या शासन निर्णयान्वये तालुक्‍यातील उपशिक्षकांचे रिक्त जागेवर समायोजन करावे. समायोजन करूनही उपशिक्षक अतिरिक्त होत असतील तर त्या शिक्षकांचे जिल्हास्तरावरून 21 डिसेंबरला समायोजन केले जाणार आहे. गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिलेल्या सूचनांप्रमाणे समायोजन प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्याचे आदेशही शिक्षणाधिकारी तानाजी घाडगे यांनी दिले आहेत.

समायोजनानंतर अहवाल द्या
तालुकास्तरावर समायोजन झाल्यानंतर रिक्त पदांचा अहवाल त्वरित जिल्हा कार्यालयास देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. यंदाच्या सेवक संचानुसार किती शिक्षक अतिरिक्त झाले किंवा किती जागा रिक्त आहेत हे 21 डिसेंबरला समजणार आहे.

Web Title: teacher taluka level adjustment