धायखिंडीत शाळेला कुलुप; शिक्षक बदलीचा विद्यार्थ्यांकडून निषेध

अण्णा काळे
शुक्रवार, 15 जून 2018

करमाळा - सर्वत्र शाळेच्या पहील्याच दिवशी विद्यार्थांचे वाजत गाजत स्वागत होत असताना धायखंडी (ता.करमाळा)येथील शिक्षकांची बदली झाल्याच्या निषेधार्थ विद्यार्थांनीची शाळेला कुलुप ठोकले आहे. तर पुर्वीचे शिक्षक शाळेत रुजु होईपर्यंत भावबंध, चुलबंद, शाळा बंदआंदोलन करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना पञ दिले आहे. 

नुकत्याच झालेल्या बदल्यात या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धायखंडी (ता.करमाळा) येथे सहशिक्षक मच्छिंद्र बिनवडे, शिवलाल शिंदे, दत्तात्रय सांगडे कार्यरत होते. शासनाच्या बदली नियमात हे शिक्षक बसत नसतानाही शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. येथील शिक्षकांनी शाळेचा दर्जा सुधारण्यासाठी मोठे कष्ट घेतले होते. येथील विद्यार्थांची गुणवत्ता ही सुधारली आहे. आज शाळेच्या पहील्या दिवशी सर्व विद्यार्थी आपल्या शिक्षकांची आठवण काढुन रडत होते. सकाळी शाळा भरण्याच्या वेळी सर्व गावकरी शाळेत जमा झाले होते.बदली होऊन आलेल्या शिक्षकांना शाळा उघडु दिली नाही.

मुख्यमंत्री साहेबांनी नियमबाह्य झालेल्या बदल्या रद्द कराव्यात अशी ग्रामस्थांनी केली आहे.

Web Title: teacher transfer problem in school