esakal | Good News : शिक्षकांच्या बदली प्रक्रियेला प्रारंभ ; या तारखेला वेळापत्रक जाहिर
sakal

बोलून बातमी शोधा

Teacher transfer process; Schedule announced on this date in belgaon

शिक्षण खात्याने शिक्षकांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे.

Good News : शिक्षकांच्या बदली प्रक्रियेला प्रारंभ ; या तारखेला वेळापत्रक जाहिर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : शाळा कधीपासून सुरू होणार, याबाबत निश्‍चित माहिती नाही. तरीही शिक्षण खात्याने शिक्षकांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. येत्या २० ऑगस्टपासून शिक्षकांच्या बदली प्रक्रियेला प्रारंभ होईल. याबाबतचे वेळापत्रक १५ ऑगस्टपर्यंत जाहीर केले जाणार आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून बदलीच्या प्रतीक्षेत असलेल्या शिक्षकांना दिलासा मिळेल.

कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि नव्याने लागू झालेले राष्ट्रीय शिक्षण धोरण यामुळे यावर्षीची बदली प्रक्रिया रखडण्याची चिन्हे होती. मात्र, शिक्षणमंत्री सुरेशकुमार यांनी शिक्षणाधिकाऱ्यांबरोबर बैठक घेऊन बदली प्रक्रिया सुरू करण्याची सूचना केली. त्यानुसार वेळापत्रक जाहीर केले जाणार असून, त्यानंतर ऐच्छिक, परस्पर बदलीसाठी ऑनलाईन प्रक्रिया सुरू होणार आहे.

हेही वाचा - देशाची आर्थिक स्थिती चिंताजनक ; ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ 

शिक्षण खात्याने गंभीर आजारी असलेल्या शिक्षकांसह एखाद्या शिक्षकाच्या घरातील पती, पत्नी किंवा मुले आजारी असतील तर त्यांना बदली प्रक्रियेपासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, ४० टक्‍के अपंगत्व असलेले शिक्षक, गर्भवती किंवा एक वर्षापेक्षा कमी वयाचे बाळ असलेल्या शिक्षिकेला, माजी सैनिक व मृत सैनिकाची पत्नी तसेच ५० वर्षांपेक्षा अधिक वयाचे शिक्षक-शिक्षिका यांनाही बदली प्रक्रियेतून सवलत देण्यात आली आहे. मात्र, याबाबतचे प्रमाणपत्र शिक्षण खात्याकडे देणे आवश्‍यक आहे. 

गेल्या वर्षी शिक्षण खात्याने सक्‍तीची बदली प्रक्रिया राबविली होती. यात एकाच ठिकाणी दहा वर्षांपेक्षा अधिक दिवस सेवा बजावलेल्या शिक्षकांचा समावेश होता. त्यामुळे सक्‍तीच्या बदलीबाबत शिक्षकांतून मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्‍त झाली होती. मात्र, या वेळी बदली प्रक्रिया नव्या नियमानुसार राबविली जाणार आहे. त्यामुळे शिक्षकस्नेही बदली प्रक्रिया राबविण्यास मदत होईल, असा विश्‍वास शिक्षण खात्याने व्यक्‍त केला आहे.

हेही वाचा - कोल्हापूरमध्ये आता एका आठवड्यात होणार पाच हजारांवर स्वॅबची तपासणी 

शिक्षक बदलीला लवकरच चालना दिली जाणार असून, याबाबत तयारी करण्याची सूचना करण्यात आली आहे. वेळापत्रक जाहीर होताच शिक्षकांना याबाबत माहिती 
दिली जाईल.
- अण्णाप्पा पॅटी, शिक्षणाधिकारी

संपादन - स्नेहल कदम