खंडोबाचीवाडीच्या शिक्षकाची तंत्रस्नेही भरारी

खंडोबाचीवाडीच्या शिक्षकाची तंत्रस्नेही भरारी

सांगली जिल्ह्यातील खटाव (ता. पलूस) येथील व खंडोबाची वाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक सूरज शिकलगार यांनी पहिली ते सातवीपर्यंतच्या अध्यापनासाठी उपयुक्त ठरेल, असे संकेतस्थळ विकसित केले आहे. स्वयंअध्यापनाच्या हेतूने सुरू केलेल्या संकेतस्थळाला राज्य नव्हे तर देश-परदेशांतून १७ लाख नेटकरांनी भेट दिली आहे. त्यात एकट्या अमेरिकेतून १ लाख ३० हजार जण आहेत. संकेतस्थळाचे देशनिहाय ऐंट्री पेजव्ह्युज असे, भारत-१,४८,७६३७, अमेरिका १,३१,८८३, अरब अमिरात देश-१४५७२, रशिया-४९३४, दक्षिण आफ्रिका-४०१६, तांझानिया-३०५१, युक्रेन-२८५१, थायलंड-२२७०, जर्मनी-११११, इंडोनेशिया-९५०, यू- ट्युबच्या मुंबई व हैदराबाद फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्याचा मान मिळवणारे प्राथमिक शिक्षण क्षेत्रातील ई-स्कूल एकमेव चॅनेल होते. त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील ‘इनोव्हेशन’बद्दल....

E - school या नावाने शिकलगार यांनी सुरू केलेल्या या संकेतस्थळावर विद्यार्थी, शिक्षक, शिक्षण क्षेत्रातील जाणकार व सामान्य नागरिक या सर्वांसाठी शिक्षण क्षेत्राशी संबंधित सर्व माहिती उपलब्ध आहे. पुर्ण मराठीबरोबरच शिक्षण क्षेत्राशी संबधित नसलेल्या इतर मराठी भाषिकांनासुद्धा या टेक्‍नॉलॉजीसंदर्भातील पोस्टमुळे फायदा होत आहे. महाराष्ट्रातील तंत्रस्नेही चळवळीचे या संकेतस्थळावर प्रतिबिंब उमटले आहे. शिक्षणाशी संबंधित शासकीय माहितीही इथे पाहता येईल. ही माहिती पूर्णतः खात्री करून संकेतस्थळावर टाकली जाते.  ही माहिती  व्हिडिओ पीडीएफची सोयही केली आहे.

विद्यार्थ्यांसाठी तर शैक्षणिक व्हिडिओचा खजिनाच आहे. या संकेतस्थळाच्या यू-ट्युब चॅनेलवर शैक्षणिक व्हिडिओचे अनेक नमुने पाहायला मिळतात. पाहिलीपासून जे विषय विद्यार्थ्यांना समजण्यास अवघड आहेत त्याचे स्वतंत्रपणे व्हिडिओ आहेत. यूट्यूबवर आपण  Eschoolindia व Studyround  या नावाने शोधल्यास सर्व व्हिडीओ एकाच दृिष्टक्षेपात आहेत. या ठिकाणी आवश्‍यक पाठाचे व्हिडिओ आणि त्या पाठ्यपुस्तक मधील संदर्भानुसार संदर्भ व्हििडओ आहेत. युट्युबच्या मुंबई व हैद्राबाद फेस्टिवलमध्ये सहभागी होण्याचा मान श्री. शिकलगार यांना मिळाला. प्राथमिक शिक्षणासंबंधित व्हिडिओ तयार करण्यासाठी यूट्युबतर्फे त्यांना स्टुडिओ किंवा त्या संबंधाने सर्व काही मदत देऊ केली आहे.
केवळ शैक्षणिक माहितीच नव्हे तर विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त अशी सर्व अप्लिकेशन तयार करणे व ती अपडेट करण्याचे कामही हे संकेतस्थळ करते. Google Play स्टोअर वर जर Eschool ४u किंवा Eschoolindia असे सर्च केल्यास या वेबसाईटवरील सर्व ॲप्लिकेशन मोफत डाऊनलोड करता येतील. यामध्ये इयत्ता पहिलीपासून सातवीपर्यंतचे मागणीनुसार आवश्‍यक सर्व अप्लिकेशन तयार आहेत आणि एकाच ॲप्लिकेशनमधील घटक सर्व इयत्तांना लागू पडेल असा समावेश केला आहे. यामधील काही ॲप्लिकेशन स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनीसुद्धा वापरले आहेत व त्यांना त्याचा प्राथमिक सरावासाठी फायदा झाला आहे. या सर्व ॲप्लीकेशनमध्ये भाषा विषयापासून बुद्धिमत्ता विषयापर्यंतच्या घटकांचा समावेश केला आहे. यातील काही ॲप्लिकेशन पूर्ण भारतातील व परदेशातील युजर्सनी डाऊनलोड केले आहेत. या ॲप्लिकेशनला गुगलच्या बंगळूरमधील GFM-२०१५ या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याचा मान मिळाला होता. आजपर्यंत Eschool४u, Eschool४all, Eschool४word,Eschool४scratch व Eschool४third हे Android App बनवले आहेत. तसेच Eschool४all हे ॲप्लिकेशन  Apple Store ला उपलब्ध आहे. 

स्वयंशिक्षण म्हणजेच ई-लर्निंगच्या साह्याने विद्यार्थी कोणाचीही मदत न घेता आनंदीपणे शिकला पाहिजे, या संकल्पनेवर श्री. शिकलगार सध्या काम करीत आहेत. या संकल्पनेवर आधारित त्यांनी इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांसाठी Eschool४third या ॲप्लिकेशनची निर्मिती केली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांच्या पाठ्यपुस्तकातील सर्व संबोध व संकल्पना, पाठ्यपुस्तक व संदर्भ व्हिडिओ, त्यांना पडलेल्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरे एकाच ठिकाणी मिळावीत असा त्यांचा प्रयत्न आहे. त्यांनी सध्या ॲप्लिकेशन निर्मिती, Animation - PPT यासारख्या व्हिडिओची निर्मिती, तसेच सामान्य माहिती यावर  त्यांनी काम केले आहे. सध्या त्यांच्या ॲनिमेशनमधील पाठ youtubers च्या पसंतीस उतरले आहेत. शिक्षण क्षेत्रातील प्रत्येकाने या संकेतस्थळाला भेट द्यावी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com