magar.gif
magar.gif

शिक्षणाबरोबरच सामाजिक बांधिलकी जपणारा शिक्षक

तारळे : प्राचीन काळी गुरुकुल पद्धतीत गुरूचे स्थान महत्त्वाचे असे, गुरुजन शिष्यांना सर्वांगसुंदर घडविण्यासोबतच गावांना दिशा देखील द्यायचे. असाच एक अवलिया आधुनिक काळात असून त्यानेही विद्यार्थी घडविण्यासोबत गावात आमूलाग्र बदल घडवून आणला. हा अवलिया म्हणजे मोगरवाडी या छोट्याशा शाळेतील शिक्षक दिपक मगर होय. 

ढोरोशी ता. पाटण येथील सुपुत्र असलेले दिपक मगर हे नोकरीत लागल्यापासून चळवळ्या शिक्षक म्हणून प्रसिद्ध होते. आपल्या बावीस वर्षांच्या सेवा काळात जाईल तेथे आपल्या कर्तृत्वाची छाप उमटविली. तेथील सहकारी, पालक, समाज व विद्यार्थ्यांच्या सोबतीने त्या शाळेचा नावलौकिक वाढविला. नोकरीच्या सुरुवातीला घोट येथे कार्यरत असताना तेथे नानाविध प्रयोग करून आदर्श शाळा बनविण्यासाठी मोलाचा वाटा उचलला.
 तारळे येथे शाळा व्यवस्थापन समिती, पालक व शिक्षण प्रेमी यांचा समन्वयातून शाळेचे रुपडे पालटले. शाळेस आयएसओ मानांकन, लोकसहभागातून सातही वर्गात एलईडी बसवून डिजिटल शाळा, बोलक्या भिंती व व्हरांडा निर्मिला, शिवाय शाळा सिद्धी श्रेणी अ दर्जा मिळविला. हे मिळविताना स्वतः प्रसिद्धीपासून अलिप्त राहून मोठे कष्ट घेतले. 

सुगम दुर्गमच्या फेऱ्यात स्वतःहून रस्ता नसलेली मोगरवाडी शाळा निवडली. दोन वर्षात या शाळेसह गावाचा कायापालट करण्यात दिपक मगर यांनी अतिशय मेहनत घेतली. ज्या गावाला रस्ता नाही अशा गावात नव्याने शाळा खोल्या उभारल्या. व्यसनमुक्ती अभियान राबवत गावतील महिलांची मिस्री  व पुरुषांची तंबाखू सोडविली. गावात विंधन विहीर(बोअरवेस) खोदली. गावाला पर्यायी रस्ता निर्माण केला. मंदिराचा जीर्णोद्धार केला. स्मशानभूमी, दोन वेळा जिल्ह्यातील शेकडो लोकांनी केलेले श्रमदान त्यांच्या समाजाशी कसे एकरूप रहावे याचे इतरांसाठी उदाहरण ठरले. अशी एक ना अनेक कामात पुढाकार घेऊन तडीस नेली.  गावकरी त्यांच्या रुपात देवदूत भेटल्याचे अभिमानाने सांगतात. 

मोगरवाडीची यशोगाथाच्या लघुपटाने केंद्र सरकारच्या शगुण पोर्टलने दखल घेतली. असा हा अवलिया शिक्षक नेहमीच प्रसिद्धी पासूनही लांब राहिला. शिक्षकदिनी सातारा जिल्हा परिषदेकडून जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन त्यांच्या कामाला न्याय दिला. या पुरस्काराने मोगरवाडी गावासह मित्र मंडळीमध्ये आनंदची लहर उमटली. त्यांच्या वाटचालीत शिक्षण संचालक सुनिल मगर, कुटुंबीय, मित्र मंडळी, आप्तेष्ट, शिक्षक सहकारी, शाळा व्यवस्थापन समित्या यांचे मोलाचे सहकार्य मिळाल्याचे आवर्जून सांगतात.

सुमारे 37 पुस्तकांचे लेखन, त्यातील संस्कारदिप या पुस्तकाने राज्यभर वाहवा मिळविली. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते गौरविण्यात आले होते. सुमारे वीस लाखांचा शैक्षणिक उठाव केला असून या वर्षी सात लाखांचा शैक्षणिक उठाव दिपक मगर यांनी करून मोगरवाडीत क्रांती घडविली आहे. लोकसहभागातून मोठी मजल मारली असून ती इतरांना प्रेरक आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com