सातवा वेतन आयोग नको, पण शेतकऱ्यांचे बघा; मुख्यमंत्र्यांना पत्र

सूर्यकांत नेटके
गुरुवार, 27 डिसेंबर 2018

"राज्यात सध्या दुष्काळी परिस्थिती गंभीर आहे. अनेक भागात लोकांना जगण्याची चिंता निर्माण झाली आहे. ज्या कष्टकरी, कामगार, शेतकऱ्यांच्या श्रमातून महाराष्ट्र उभा राहिला आहे. त्यांना आधार देणं हे प्रत्येकांच काम आहे. शेतकरी जगला, तरच समाज जगेल. त्याच भावनेतून मी "सातवा वेतन आयोग देण्याआधी शेतकऱ्यांकडे पाहण्याबाबत' विनंती करणारे पत्र दिले आहे. हे माझे वैयक्तिक आहे. वेतन आयोग मिळावा. पण सध्याच्या परिस्थितीचा विचार करता शेतकऱ्यांना आधार मिळणं फार गरजेचे आहे.''
- किरण खैरनार, प्राथमिक शिक्षक, समनापुर, ता. संगमनेर जि. नगर

नगर : "मी एक शेतकरी कुटूंबातील आहेत. वीस वर्षाच्या नोकरीच्या काळात दोन वेतन आयोग मिळालेत. त्यातून मिळणाऱ्या पैशात सर्व गरजा भागवून पगार उरतो. मात्र सातत्याने पडणारा दुष्काळ, शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या मला बैचेन करुन टाकत आहेत. त्यामुळे मला सातवा वेतन आयोग नको, पण आधी शेतकऱ्यांकडे पहा'' अशी विनंती चक्क एका प्राथमिक शिक्षकाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देऊन केली आहे. दोन दिवसापासून हे पत्र सोशल मिडीयीवर राज्यभर व्हायरल झाले असून शिक्षक, कर्मचाऱ्यात याची चर्चा सुरु झाली आहे.

नगर जिल्ह्यातील समनापुर (ता. संगमनेर) येथील जिल्हा परिषद शाळेत किरण खरैनार हे प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. आदर्श शिक्षक म्हणून
त्यांच्याकडे या भागात पाहिले जाते. समाजीक कामांत सातत्याने पुढाकार असलेल्या किरण खैरनार यांनी साधारण पंधरा दिवसापुर्वी भूमिपुत्र शेतकरी संघटनेमार्फत मुख्यमंत्र्यांना हे पत्र दिले असून ते पत्र काल (बुधवारी) सोशल मिडीयीवर व्हायरल झाले आणि किरण खैरनार यांच्या पत्राची एकदम राज्यात चर्चा सुरु झाली. खैरनार यांनी दिलेल्या पत्रात शेतकरी प्रती कृतत्रता व्यक्त केली आहे. ""मी एक शेतकरी कुटूंबातील आहेत. वीस वर्षाच्या नोकरीच्या काळात दोन वेतन आयोग मिळालेत. त्यातून मिळणाऱ्या पैशात सर्व गरजा भागवून पगार उरतो. मात्र सातत्याने पडणारा दुष्काळ, शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या मला बैचेन करुन टाकत आहेत. त्यामुळे
मला सातवा वेतन आयोग नको, पण शेतकऱ्यांचे बघा. राज्यातील इतर बाबीवर खर्च करताना प्रथम प्राधान्याने शेतकरी कर्जमुक्ती, शेतमालाला दर मिळावा, दुष्काळी मदत देण्याला प्राधान्य द्यावे. एकवेळ वेतन आयोग नाही मिळाला किंवा उशिरा मिळाला तरी चालेल, मात्र रक्ताचे थेंब आश्रुत मिसळून जगण्याची धडपड करणाऱ्या शेतकऱ्यांना जगवलं पाहिजे.'' अशी भावना त्यांनी पत्रात नमुद केली आहे. खैरनार यांना पत्र वाचून राज्यभरातून फोन येत असून त्यांच्या भूमिकेचे अनेक शेतकरी, कर्मचारी, अधिकाऱ्यांनी स्वागत केले आहे. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटूंबातील लोकांचे तसेच मानसिकता खचलेल्या शेतकऱ्यांचेही फोन येत असल्याचे किरण खैरनार यांनी सांगितले.

"राज्यात सध्या दुष्काळी परिस्थिती गंभीर आहे. अनेक भागात लोकांना जगण्याची चिंता निर्माण झाली आहे. ज्या कष्टकरी, कामगार, शेतकऱ्यांच्या श्रमातून महाराष्ट्र उभा राहिला आहे. त्यांना आधार देणं हे प्रत्येकांच काम आहे. शेतकरी जगला, तरच समाज जगेल. त्याच भावनेतून मी "सातवा वेतन आयोग देण्याआधी शेतकऱ्यांकडे पाहण्याबाबत' विनंती करणारे पत्र दिले आहे. हे माझे वैयक्तिक आहे. वेतन आयोग मिळावा. पण सध्याच्या परिस्थितीचा विचार करता शेतकऱ्यांना आधार मिळणं फार गरजेचे आहे.''
- किरण खैरनार, प्राथमिक शिक्षक, समनापुर, ता. संगमनेर जि. नगर

Web Title: teacher write letter to CM Devendra Fadnavis on Drought issue