मंगळवेढा - आदर्श शिक्षक व विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न

हुकूम मुलाणी
मंगळवार, 20 मार्च 2018

मंगळवेढा (सोलापूर) : लहान मुलांना संस्कृती मिळावी असे वाटत असेल तर जि.प.च्या शाळांमध्ये मुलांना चांगली शिस्त व संस्कृती मिळते. म्हणून सध्याच्या काळात जिल्हा परिषदेच्या शाळा टिकवणे गरचेचे आहे. असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे यांनी केले आहे                  

मंगळवेढा (सोलापूर) : लहान मुलांना संस्कृती मिळावी असे वाटत असेल तर जि.प.च्या शाळांमध्ये मुलांना चांगली शिस्त व संस्कृती मिळते. म्हणून सध्याच्या काळात जिल्हा परिषदेच्या शाळा टिकवणे गरचेचे आहे. असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे यांनी केले आहे                  

पंचायत समिती शिक्षण विभागाचा आदर्श शिक्षकांचा विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळ्या प्रसंगी ते बोलत होते. जि.प.अध्यक्ष शिंदे म्हणाले की, शिक्षकांनी केलेल्या कामाचे मूल्यमापन झाले पाहिजे. मानसिकता बदलून कार्य वाढविण्यास मदत होते. प्राथमिक शिक्षक हा समाजातील पायातील घटक आहे. इंग्रजी शिक्षण घेतल्यास जास्त प्रगती होत नाही. इंग्रजी ही काळाची गरज आहे.पण मराठी भाषा सुध्दा खूप महत्त्वाची आहे. सध्याच्या इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणाबरोबर जि.प.शाळेतही गुणवंत विद्यार्थी घडविण्याचे काम शिक्षकांनी केले काम करणाऱ्या व्यक्तीचे कार्य पाहून त्यांचा सन्मान करणे व त्याच्या कार्यास प्रोत्साहनही दिले पाहिजे.

दामाजी कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे म्हणाले की, शिक्षक हा समाजातील महत्त्वाचा घटक आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून येणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याचे ज्ञान अवगत करून भविष्यातील पिढी घडवण्याचे मोठे योगदान शिक्षकांनी दिले. यावेळी दामाजी शुगरचे अध्यक्ष समाधान आवताडे, समाजकल्याण सभापती शिलाताई शिवशरण, उपाध्यक्ष शिवानंद पाटील, सभापती प्रदीप खांडेकर, उपसभापती विमल पाटील, जि.प सदस्य नितीन नकाते, मंजुषा कोळेकर, पं.स.सदस्या उज्वला मस्के, सचिन शिवशरण, गटविकास अधिकारी राजेंद्रकुमार जाधव, गट शिक्षणाधिकारी हणमंत कोष्टी, बजरंग पांढरे, लक्ष्मीकांत कुमठेकर संजय चेळेकर, सुरेश पवार आदी उपस्थित होते. प्रास्ताविक हणमंत कोष्टी यांनी केले. सूत्रसंचालन दिगंबर तोडकरी यांनी तर आभार रामचंद्र पाटील यांनी मानले.

यांना मिळाले पुरस्कार....

हिरालाल कौडूभैरी (केंद्रप्रमुख), कामण्णा ऐवळे (मुख्याध्यापक), हरीभाऊ लोखंडे, सुखदेव सांगोलकर, आप्पाराया न्यामगोंडे, सारीका कोरे, अशोक शिंदे, सुजाता पुजारी, राजश्री माळी, क्रांती भालेकर, लता मलगोंडे, वनिता बुरकुल, भिमण्णा धायगोंडे, सत्यभामा पाटील, कविराज दत्तू, सिध्देश्वर मेटकरी, मंगल बनसोडे, सविता कुदळे, अशोक रायबान, सुषमा सुतार, मनिषा पवार.

Web Title: teachers and students felicitating