बदल्यांविरोधात शिक्षक संघ न्यायालयात जाणार 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 मे 2017

सोलापूर - ग्रामविकास विभागाने 27 फेब्रुवारीला काढलेला आदेश हा शिक्षकांवर अन्याय करणारा आहे. या आदेशाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याची माहिती शिक्षक संघाच्या संभाजीराव थोरात गटाचे जिल्हाध्यक्ष म. ज. मोरे यांनी दिली. 

न्यायालयात याचिका दाखल करण्यासंदर्भात वकिलांचा सल्ला घेतला आहे. येत्या मंगळवारी (ता. 16) या आदेशाविरोधात याचिका दाखल केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. शिक्षकांच्या बदल्यांच्या संदर्भातील आदेशात सुधारणा करण्यासंदर्भात अनेक ठिकाणी बैठका झाल्या आहेत. मात्र, त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही. माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या मध्यस्थीने बुधवारी (ता. 17) ते मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याची शक्‍यता आहे. त्या वेळी मुख्यमंत्री या शिक्षक नेत्यांना वेळ देतात का? याकडे शिक्षकांचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्र्यांच्या भेटीपूर्वी न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय संघाने घेतला आहे. 

स्थानिक पदाधिकाऱ्यांचे अपयश 
बदल्यांच्या संदर्भात शिक्षक नेत्यांनी स्थानिक नेत्यांशी चर्चा केली आहे. मात्र, त्यातून शिक्षक नेत्यांच्या फारसे काही हाती लागले नसल्याचे दिसून येते. शिक्षकांच्या बदल्यांच्या संदर्भात काहीच करता न येणे हे स्थानिक पदाधिकाऱ्यांचे अपयश असल्याचे बोलले जाते.

Web Title: Teachers' association against transfers will go to court