अभिनव बालविकास मंदिर व आदर्श इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षक दिन उत्साहात

अभिनव बालविकास मंदिर व आदर्श इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षक दिन उत्साहात

सटाणा : मविप्र समाज संस्था संचालित अभिनव बालविकास मंदिर प्राथमिक शाळा व आदर्श इंग्लिश मिडीअम स्कूलमध्ये आज बुधवार (ता.5) रोजी माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती शिक्षक दिन म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली. आज दिवसभर चिमुकल्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांची शिक्षकांची भूमिका पार पाडली. विद्यार्थिनींनी परिधान केलेल्या विविधरंगी साड्यांमुळे आज शाळेत उत्सव असल्याचा भास होत होता.

शाळेच्या आवारात शिक्षकदिनाचे औचित्य साधून आयोजित गुणगौरव समारंभाच्या अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा ज्योती सोनवणे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून अॅड. सरोज चंद्रात्रे, मुख्याध्यापक कारभारी तांदळे, प्रदीप सोनवणे, मुख्याध्यापिका एस. आर. चंद्रात्रे, राजेंद्र सोनवणे, एकनाथ देवरे, किरण नांद्रे आदी उपस्थित होते. सौ. सोनवणे यांच्या हस्ते डॉ. राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सुप्रिया देवरे यांनी प्रास्ताविकात डॉ. राधाकृष्णन यांच्या जीवनकार्याविषयी माहिती दिली.

अभिनव विद्यालयात जय खैरनार याने तर आदर्श स्कूलमध्ये अनुष्का बच्छाव या विद्यार्थिनीने मुख्याध्यापक म्हणून तसेच इतर विद्यार्थ्यांनी शिक्षक व शिक्षिकांच्या भूमिकेत दिवसभर कामकाज पाहिले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. कार्यक्रमास क्रांती अहिरे, मंगला शेवाळे, मनीषा देवरे, शरद गुंजाळ, नरेंद्र मोरे, बाळासाहेब पवार, स्वप्निल पवार, कामिनी अहिरे, शालिनी सोनवणे, सविता पगार, सुप्रिया देवरे, मनीषा सोनवणे, स्फूर्ती पाटील, जयश्री निकम आदींसह शिक्षक, विद्यार्थी व पालक उपस्थित होते. मनीषा देवरे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com