‘टीईटी’ व्हा, नोकरी वाचवा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

सोलापूर - राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी शैक्षणिक संस्थांमध्ये पहिली ते आठवीच्या वर्गासाठी अध्यापन करणाऱ्या शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण होणे बंधनकारक केले आहे. येत्या ३० मार्चपर्यंत ही परीक्षा उत्तीर्ण न झाल्यास शिक्षकांची नोकरी जाणार आहे. त्याबाबतचा आदेश शालेय शिक्षण विभागाने काढला आहे. त्याचा झटका राज्यातील अनेक शिक्षकांना बसणार आहे.  

बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकारांतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना अध्यापन करणाऱ्या शिक्षकांनी टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे. १३ फेब्रुवारी २०१३ नंतर शिक्षक पदावर नियुक्त झालेल्या शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक परिषदेने निश्‍चित केलेली टीईटी ही परीक्षा ३० मार्च २०१९ पर्यंत उत्तीर्ण व्हावे लागणार आहे. अल्पसंख्याक शाळांमध्ये अध्यापनाचे काम करणाऱ्या शिक्षकांनाही हा निर्णय लागू असणार आहे. 

सेवेत कार्यरत असलेल्यापण टीईटी उत्तीर्ण न झालेल्या राज्यातील अनेक शिक्षकांना ही परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागणार आहे. ही परीक्षा उत्तीर्ण होण्यात गुरुजींना अपयश आल्यास त्यांना आपल्या नोकरीवर पाणी सोडावे लागणार आहे. 

टीईटी नसलेल्या शिक्षकांच्या सेवा समाप्त करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ३० मार्च २०१९ पूर्वी टीईटी उत्तीर्ण होणे गरजेचे आहे. मात्र यासाठी शासनाने दोन टीईटी परीक्षा घेणे आवश्‍यक आहे. नोव्हेंबरमध्ये एक, तर फेब्रुवारीमध्ये एक असा दोन परीक्षा घ्याव्यात. तसे झाले तर टीईटी नसलेल्या शिक्षकांना ती परीक्षा देऊन उत्तीर्ण होणे सोईचे होणार आहे. 
- तानाजी माने, अध्यक्ष, जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ, सोलापूर

सुमारे पाच हजार शिक्षकांच्या नोकऱ्या धोक्‍यात
राज्यात २०१२-१३ मध्ये खासगी शिक्षण संस्थांच्या काही तुकड्यांना मान्यता दिली आहे. त्याचबरोबर २०१३-१४ मध्येही अनेक तुकड्यांना मान्यता दिली आहे. यासाठी शिक्षकांची भरतीही केली आहे. या दोन्ही वर्षांत जवळपास पाच हजार शिक्षकांची भरती झालेली आहे. त्यामुळे त्यांच्या नोकऱ्या धोक्‍यात येण्याची शक्‍यता आहे. 

Web Title: Teachers have been mandated to pass the Teacher Eligibility Test