"झेडपी'च्या गुरुजींना मायक्रोसॉफ्टचा पुरस्कार 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 जुलै 2018

सोलापूर : मायक्रोसॉफ्टच्या वतीने दिले जाणारे मायक्रोसॉफ्ट इनोव्हेटिव्ह एज्युकेटर एक्‍स्पर्ट पुरस्कारावर जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी आपले नाव कोरले आहे. वर्गातील अध्यापनामध्ये नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शिक्षण पद्धतीला वेगळे आयाम देणाऱ्या शिक्षकांना मायक्रोसॉफ्टच्यावतीने हे पुरस्कार दिले जातात. 

यंदाच्या वर्षी राज्यातून सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत असलेले शिक्षक रणजितसिंह डिसले व नांदेड जिल्हा परिषदेत कार्यरत असलेले शिक्षक सुनील अळूरकर यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. 

रणजितसिंह डिसले यांनी व्हर्च्युअल फिल्ड ट्रीप या अभिनव प्रयोगाद्वारे जगभरातील 54 हुन अधिक देशांतील 800 पेक्षा अधिक शाळांमधील मुलांना वैज्ञानिक संकल्पनाचे धडे दिले आहेत. त्यांना हा बहुमान चौथ्यांदा मिळाला आहे. सुनील अळूरकर हे नांदेड जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत शिक्षक असून मॉसिव्ह ओपन ऑनलाइन कोर्सच्या मदतीने बनवलेली "झेडपी गुरुजी डॉट कॉम' या संकेतस्थळाच्या मदतीने जवळपास एक लाखाहून अधिक शिक्षकांना तंत्रज्ञानाचे धडे त्यांनी दिले आहेत. या दोन्ही गुरुजींना मिळालेल्या या पुरस्कारामुळे त्यांचे कौतुक केले जात आहे. 

डिसले यांनी नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर करून अनेक वेगवेगळे प्रयोग केले आहेत. त्यांच्या या प्रयोगांना मायक्रोसॉफ्टने पुरस्काराच्या माध्यमातून प्रोत्साहन दिले आहे. त्याच्या या तंत्रज्ञानाचा फायदा जिल्हा परिषदेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना होत आहे. 
 
Web Title: teachers of zp won Microsoft award