आटपाडी तालुक्यात लाईटबिल न भरल्याने तोडली टेलिफोन एक्सचेंजची वीज

आटपाडी तालुक्यात लाईटबिल न भरल्याने तोडली टेलिफोन एक्सचेंजची वीज

झरे -  गेल्या दोन दिवसापासून आटपाडी तालुक्यातील सर्व टेलिफोन एक्सचेंज बंद आहेत. आक्टोबरपासून वीजबिल भरले नाही त्यामुळे महावितरणने टेलिफोन एक्सेंजचा वीज पुरवठा खंडित केला आहे. आणखी दोन दिवसतरी टेलिफोन एक्सचेंज बंद राहतील, अशी माहिती टेलिफोन आॅफिसर एस एम लिगाडे  यांनी दिली. 

तालुक्यातील झरे, घरनिकी, घानंद, खरसुंडी, हिवतड, गोमेवाडी, तळेवाडी, तडवळे, दिघंची, राजेवाडी, कौठूळी, आवळाई आदी ठिकाणी टेलिफोन कार्यालय आहेत. या कार्यालयांनी वीज बील न भरल्याने महावितरणने वीज खंडित केला आहे. याचा परिणाम ग्रामीण भागातील आॅनलाईन सेवावर झाला आहे. 

आक्टोंबरपासून बिले भरली नाहीत. अजून चार दिवस बिले भरली जाऊ शकत नाहीत. वीजबिले मुंबई कार्यालयातून आॅनलाईन भरली जातात. त्यामुळे आम्ही याबाबत काहीच करू शकत नाही.

- एस. एन. लिगाडे,  ज्युनियर टेलिकॉम आॅफिसर, आटपाडी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com