दोन हजार दूरध्वनी कनेक्‍शनचे स्थलांतर

सातारा - ग्रेडसेपरेटरच्या खोदकामात दूरध्वनी सेवेच्या वाहिन्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी यंत्रणेद्वारे दोरखंडाने वायर बांधून ठेवण्यात येतात.
सातारा - ग्रेडसेपरेटरच्या खोदकामात दूरध्वनी सेवेच्या वाहिन्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी यंत्रणेद्वारे दोरखंडाने वायर बांधून ठेवण्यात येतात.

सातारा - भारत संचार निगम लिमिटेडतर्फे सुमारे दोन हजार दूरध्वनी कनेक्‍शनच्या स्थलांतराचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. ग्रेड सेपरेटरच्या कामामुळे काही वेळा दूरध्वनी कनेक्‍शन विस्कळित होत आहे. त्यामुळे ‘बीएसएनएल’ने रविवार पेठेत नव्याने यंत्रणा उभारली आहे. 

पोवई नाक्‍यावर ग्रेड सेपरेटरचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या ठिकाणी खोदकाम सुरू असताना काही वेळेला यंत्राचा धक्का रस्त्याच्या मधून जाणाऱ्या दूरध्वनीच्या वायरला बसतो. त्यामुळे पोवई नाका, बस स्थानक तसेच राजपथावरील ग्राहकांची दूरध्वनी यंत्रणेची सेवा कोलमडत असते. ग्रेड सेपरेटरचे काम करणारी यंत्रणा व बीएसएनएलच्या कर्मचारी यांच्यामध्ये समन्वय असल्याने आतापर्यंत विस्कळित झालेली यंत्रणा एक-दोन दिवसांत सुरळीत होत असते. ग्रेड सेपरेटरच्या कामाची गती वाढली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून थोडे पुढच्या अंतरावर तसेच पोवई नाका ते पंचायत समितीच्या कार्यालयापर्यंत खोदकाम सुरू आहे. या खोदकामात दगड, माती ठिसूळ झाल्यानंतर ती काही वेळेला ‘बीएसएनएल’च्या मोठ्या वायरींवर आदळते. त्यामुळे दूरध्वनीच्या लाइन्स तुटतात. गेल्या आठवड्यापासून सुमारे ४०० ते ५०० ग्राहकांची दूरध्वनी सेवा विस्कळित झाली आहे. ही सर्व कनेक्‍शन पूर्ववत करण्यासाठी ‘बीएसएनएल’चे दोन अधिकारी व सुमारे १५ कर्मचारी रात्रंदिवस काम करीत आहेत. ‘बीएसएनएल’द्वारे पुरविण्यात येणारी दूरध्वनीची कनेक्‍शन अमर्याद दिवस खंडित होऊ नये, यासाठी रविवार पेठेत एक स्वतंत्र कार्यालय उघडण्यात आले आहे. तेथील यंत्रणेद्वारे वाहिन्या स्थलांतरित करण्यात येत आहेत. 

अडचण असल्यास संपर्क साधा
दरम्यान, ग्राहकांनी दूरध्वनी सेवा, ब्रॉडबॅंड सेवा तसेच अन्य सुविधांबाबत अडचणी असल्यास नजीकच्या ग्राहक सेवा केंद्रात संपर्क साधावा, असे आवाहन ‘बीएसएनएल’द्वारे केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com