टेंभूचा डावा कालवा एका गटात, नोंदी दुसऱ्यात

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 नोव्हेंबर 2018

झरे - झरे, पडळकरवाडी (ता.आटपाडी) येथे टेंभू योजनेचा डावा कालवा आला आहे. कालवा घरनिकीतून पडळकरवाडी, पारेकरवाडी मार्गे झरेकडे येतो. कालव्यात ज्यांच्या जमिनी गेल्या त्या जमिनीची नोंदच टेंभू कार्यालयाकडे नाही. कार्यालयाकडे जिथून कालवा गेला नाही अशा शेतकऱ्याचे गट नोंद झाले आहेत. हा उफराटा प्रकार शेतकऱ्यांची डोकेदुखी बनला आहे.  

झरे - झरे, पडळकरवाडी (ता.आटपाडी) येथे टेंभू योजनेचा डावा कालवा आला आहे. कालवा घरनिकीतून पडळकरवाडी, पारेकरवाडी मार्गे झरेकडे येतो. कालव्यात ज्यांच्या जमिनी गेल्या त्या जमिनीची नोंदच टेंभू कार्यालयाकडे नाही. कार्यालयाकडे जिथून कालवा गेला नाही अशा शेतकऱ्याचे गट नोंद झाले आहेत. हा उफराटा प्रकार शेतकऱ्यांची डोकेदुखी बनला आहे.  

सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल पडळकर यांच्या ही गोष्ट लक्षात आल्यावर त्यांनी लघु पाटबंधारे विभागाच्या उपविभागीय अधिकाऱ्यांकडे (आटपाडी) दाद मागितली. त्याची लेखी तक्रार केली. लघु पाटबंधारे विभागाने गटाचा समावेश नवीन भूसंपादन करण्यासाठी चालू उतारे द्यावेत असे पत्र पाठवले आहे.

टेंभू डावा कालव्यात गेलेली जमीन (प्रत्यक्ष)
गट नंबर ३९९, ८२२, ९०५, ६०२, ८२९, ८३०, ८४२, ८५४, ९०९, ९१०, ९०६ व अन्य. या गटातून घरनिकीपासून डावा कालवा पडळकरवाडीपर्यंतचे वरील काही गट आहेत. या गटांची टेंभूकडे नोंद नाही. म्हणजे कालवा दुसऱ्या गटातून जातो आणि नोंद तिसऱ्याच गटाची आहेत.

डाव्या कालव्यात ज्यांची जमिन गेली आहे त्याची कार्यालयाकडे नोंदच नाही. त्यांना भरपाई कशी मिळणार. ज्या जमिनीच्या नोंदी टेंभू कार्यालयाकडे आहेत त्या कालव्यापासून अर्धा किलोमीटरवर आहेत. एक तर कालवा चुकीचा काढला असावा किंवा गट नंबर चुकीचे लिहिले असावेत. त्याची टेंभू कार्यालयाने ताबडतोब दुरुस्ती करावी, अशी मागणी आहे.

ज्यांच्या जमिनीतून कालवा गेला त्याच्या गटाच्या नोंदी संबंधित विभागाने त्वरित करून घ्याव्यात. ज्या जमिनी संपादित केल्या आहेत, त्या शेतकऱ्यांना भरपाई मिळावी.
- विठ्ठल पडळकर,
सामाजिक कार्यकर्ते

ग्रामस्थांच्या तक्रारीची दाखल घेत प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. काही गट राहिलेत हे शेतकऱ्यांनी निदर्शनास आणून दिले. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलणे झाले. ज्याचे गट राहिले व ज्यांचे गट चुकून आले आहेत त्याच्या दुरुस्तीसाठी प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवण्याचे काम सुरू आहे. 
- श्री. मोरे,
शाखा अभियंता, लघुपाटबंधारे विभाग, आटपाडी

Web Title: Tembhu canal in one group and enteries on other

टॅग्स