टेंभूर्णी-कु्र्डुवाडी-बार्शी रस्त्याचे काम मे अखेरपर्यंत पूर्ण होणार

किरण  चव्हाण
गुरुवार, 29 मार्च 2018

माढा (सोलापूर) ः टेंभूर्णी-कु्र्डुवाडी-बार्शी या रस्त्याचे काम मे अखेर पूर्ण करणार असल्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेमधे माढयाचे आ. बबनराव शिंदे व बार्शीचे आ. दिलीप सोपल यांनी विचारलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना सांगितले.  

मराठवाड्याचे प्रवेशव्दार असणार कुर्डुवाडी बार्शी हा रस्ता खड्डेमय झाला आहे. अनेक दुरूत्या करूनही रस्ता ख़ड्डेमय आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी 25 कोटींचा  निधी मंजूर असूनही काम सुरू न झाल्याने आ. शिंदे व आ. सोपल यांनी विधानसभेमध्ये लक्षवेधी मांडली होती. 

याला उत्तर देताना सार्वजनिक बांधकामंत्री चंद्रकांत पाटील यांनी सदरचा रस्ता अत्यंत खराब असून खड्डे भरूनही रस्त्याची दुरूस्ती होऊ शकलेली नाही. त्यामुळे रस्त्याच्या दुरुस्तीसाठी 25 कोटी रूपयांच्या कामाचे टेंडर मंजूर असून उर्वरित कामाच्या निविदा आठ दिवसात मंजूर करून कामे सुरु करणार असल्याचे आहे.  तसेच टेंभुर्णी ते बार्शी या रस्त्याचे काम मे 2018 अखेर पुर्ण करणार असल्याचे सांगितले.

या चर्चेत लातूर जिल्ह्यातील आ.त्र्यंबकराव भिसे, आ.राणाजगजितसिंह पाटील, आ.सुभाष साबणे यांनी सहभाग घेऊन रस्त्याचे काम तातडीने मार्गी लावण्याची मागणी केली.

शिवाय म्हसवड - टेंभुर्णी - कुर्डूवाडी - बार्शी - येडशी - लातूर हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग 548 म्हणून घोषीत झाला आहे. यातील म्हसवड ते टेंभुर्णी या मार्गाच्या निविदा होऊन प्रत्यक्षपणे रस्त्याचे काम सुरु झाले आहे. परंतु टेंभुर्णी - कुर्डूवाडी - बार्शी - येडशी - लातूर या कामाबाबत न्यायालयीन प्रक्रियेमुळे या रस्त्याचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून सुरू झाले नाही.

शिवाय टेंभुर्णी - कुर्डूवाडी - बार्शी या मार्गावर साखर कारखान्याच्या वाहनांची संख्या व प्रवाशी वाहतुकीचा विचार करून सर्व्हिस रस्ता प्रस्तावित करणेची मागणी केली आहे. त्यावर सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी न्यायालयीन प्रकरणात राज्यसरकार तातडीने काम करेल व कारखाना परिसरात नागरीकांची वाहतुकीची सोय व्हावी यासाठी सर्व्हिस रोडसाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवून पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिल्याचे आ. शिंदेंनी सांगितले.

Web Title: tembhurni kurduvadi barshi road completed till may