आम्ही येतोय, तुम्हीही या...!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 फेब्रुवारी 2019

‘सकाळ’च्या या मोहिमेला समाजातील विविध घटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे. आम्हीही मित्र-परिवारासह सक्रिय पुढाकार घेणार. 
- प्रदीप गुरव,
टेंबलाई मंदिर गुरव-पुजारी मंडळ

कोल्हापूर - शहराचा नैसर्गिक वारसा असलेल्या टेंबलाई टेकडी परिसराच्या स्वच्छतेसाठी आता अनेकांचे हात पुढे येऊ लागले आहेत. केवळ एक दिवसापुरतीच ही मोहीम मर्यादित न राहता त्यात सातत्य राहावे, यासाठी कृती कार्यक्रम तयार केला जाणार असून, त्यातही सक्रिय योगदान देणार असल्याची ग्वाही विविध संस्था, तरुण मंडळांनी दिली आहे. शनिवारी (ता. २३) सकाळी सात ते नऊ या वेळेत ही स्वच्छता मोहीम राबविली जाणार आहे.

‘सकाळ माध्यम समूहा’च्या पुढाकारातून ही मोहीम होत आहे. 
यात महापालिका, देवस्थान समिती, टेंबलाई मंदिर  वहिवाटदार  गुरव-पुजारी मंडळासह विविध सेवाभावी संस्था, स्थानिक लोकप्रतिनिधी, तरुण मंडळांच्या  सक्रिय सहभागातून ‘चला, टेंबलाई टेकडी सुंदर बनवू या’ ही मोहीम हाती घेतली जाणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून स्वच्छता मोहीम होणार आहे. 

‘सकाळ’च्या या मोहिमेला समाजातील विविध घटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे. आम्हीही मित्र-परिवारासह सक्रिय पुढाकार घेणार. 
- प्रदीप गुरव,
टेंबलाई मंदिर गुरव-पुजारी मंडळ

आमचा असेल सहभाग...
हिंदू युवा प्रतिष्ठान, व्हाईट आर्मी, अरिहंत जैन फाउंडेशन, निसर्गमित्र संस्था, जीवनधारा ब्लड बॅंक, प्रायव्हेट क्‍लासेस टीचर्स असोसिएशन, टेंबलाई टेकडी वॉकर्स ग्रुप, हास्य क्‍लब, स्वामी समर्थ तरुण मंडळ (शाहू कॉलनी), एव्हरेस्ट हायकर्स, साई तरुण मंडळ, नवदुर्गा तरुण मंडळ.

Web Title: Temblai Hill Cleanliness Campaign Kolhapur Sakal Event