वाढत्या तापमानामुळे दूध उत्पादनात मोठी घट

milk
milk

मोहोळ : दररोजच्या वाढत्या तापमानाचा शेतकऱ्यांच्या अर्थकारणावर मोठा परिणाम झाला असून, दूध उत्पादनात मोठी घट झाली आहे. एका गायीमागे किमान दोन लिटर दुधाची घट झाली आहे, मात्र पशुखाद्याचे भाव वरचेवर वाढत आहेत, त्यामुळे दूध व्यवसाय सध्या तोट्यात आहे.

शेतीला जोडधंदा म्हणून सध्या ग्रामीण भागात सर्रास दूध व्यवसाय केला जातो. यामुळे शेतीला खत व आठवड्याला लागणारे प्रपंचासाठी पैसे या दोन्ही गरजा भागत आहेत. मात्र गेल्या आठवड्यापासून तपमानात प्रचंड वाढ झाल्याने गाई म्हशीच्या दुधात कमालीची घट झाली आहे .प्रत्येक शेतकऱ्याकडे दुग्ध व्यवसाया करिता जर्सी गाई चे प्रमाण जास्त आहे .ज्यादा तापमानामुळे जनावरे हावण्या च्या  प्रमाणात वाढ झाली आहे. तर गायीच्या स्तनातील  दगडी रोगाचे प्रमाण वाढले आहे .जनावरे उन्हामुळे जादा पाणी पितात, त्यामुळे धार काढते वेळी पान्हा सोडण्याची जनावरांना अडचणी येत आहेत.

मूळच्या जर्सी गायी या बाहेरील देशातील आहेत.वाढत्या  तापमानात या गायी गम काढत नाहीत, त्यामुळे त्या दगावण्याचे प्रमाण वाढले आहे. खाल्लेल्या अन्नाचे पचन करण्यासाठी रवंत करतानाही जनावरांना अडचणी येत आहेत. दुष्काळात तेरावा म्हणून चाऱ्याचे व पशुखाद्याचे दर वाढले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील दूध व्यवसाय तोट्यात आला आहे.

ग्रामीण भागातील चाऱ्यांचे व पशुखाद्याचे दर पुढील प्रमाणे
ऊस -३ हजार रुपये प्रती गुंठा
कडवळ -1200 रुपये प्रती गुंठा 
हिरवी मका -1400 रुपये प्रती गुंठा 
पशुखाद्य - 1400 रुपये प्रती 50 किलो 
शेंगदाणा पेंड -2 हजार रुपये प्रती 50 किलो 

वाढत्या तपमानामुळे गोपालनाबरोबरच आमच्या व्यवसायालाही फटका बसला आहे, दररोजच्या दिड हजार लीटर दुधाचे संकलन कमी होत आहे.
- अमोल पाटील ( दुध संकलक, पापरी)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com