चाळिशीपार तापमानात मोफत ताकाचा थंडावा 

चाळिशीपार तापमानात मोफत ताकाचा थंडावा 


सांगली- लॉकडाउनमुळे यंदा शहरात विविध ठिकाणी मिळणारे शीतपेय नजरेसही पडले नाही. सामाजिक संस्था, संघटनांतर्फे कोपऱ्या- कोपऱ्यावर पाणपोईची सोय कुठेच दिसली नाही. मात्र, उन्हाळा सरता-सरता गेल्या चार दिवसांत तापमान चाळिशीपार गेले आहे. जिवाची काहिली होणाऱ्या या वातावरणात जिभेला थंडावा देण्यासाठी गीर गाईच्या गोठ्यातील ताज्या दुधाचे थंडगार ताक भरदुपारी प्यायची संधी संवेदना फाउंडेशन व महाजन परिवाराने मोफत दिली आहे. 


लॉकडाउनच्या शेवटच्या टप्प्यात बाजारपेठ हळूहळू पूर्वपदावर येत आहे. संवेदना फाउंडेशन व मुंबईस्थित महाजन परिवारातर्फे मोफत ताक वाटपाचा नुकताच प्रारंभ झाला. सोशल डिस्टन्सिंग व स्वच्छतेच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करीत हा उपक्रम सुरू आहे. रोज वेगवेगळ्या ठिकाणी सुमारे एक हजार ग्लास ताक वाटण्यात येते. संवेदना फाउंडेशनचे रौनक शहा यांनी स्वखर्चातून काही वर्षांपूर्वी गीर गायींची शाळा सुरू केली. पांथस्थ, मोलमजुरी करणारे, कष्टकऱ्यांसह उन्हाने कासावीस झालेल्या जिवांसाठी हा अनोखा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. 


दरम्यान, याबाबत संवेदना फाउंडेशनचे रौनक शहा म्हणाले, ""रोज 200 लोकांच्या भोजनाची सोय केली आहे. परप्रांतीय मजूर, कष्टकऱ्यांसाठी सुरू केला आहे. संवेदना फाउंडेशनने विधायक कामांची व्याप्ती लोकसहभाग घेऊन करण्याचे ठरविले आहे.'' 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com