'जैन मंदीर, परिसर स्वछता करण्याचा सामाजिक उपक्रम हाती'

राजकुमार शहा 
मंगळवार, 27 मार्च 2018

चालु वर्षी पुणे सातारा सोलापूर उस्मानाबाद व अहमदनगर या पाच जिल्हातील सुमारे शंभर जैन मंदीर व परिसर स्वछता करण्याचा महत्वपुर्ण उपक्रम हाती घेतल्याचे गांधी यांनी सांगितले. या पाच जिल्हयात तेराशे सभासद असुन मोहीम सुरू झाल्यापासून निरा टेंभुर्णी सोलापूर व अकलुज येथील किर्ती स्तंभाची स्वछता केली असुन, उर्वरीत ठिकाणी हे काम युद्व पातळीवर सुरू आहे. यावेळी सन्मती सेवा दलाचे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

मोहोळ : येत्या भगवान महावीर जयंती निमित्त स्वछता अभियानाचा एक भाग म्हणुन सन्मती सेवा दलातर्फे पाच जिल्हयातील सुमारे शंभर जैन मंदीर व परिसर स्वछता करण्याचा सामाजिक उपक्रम हाती घेतला असल्याची माहिती सेवा दलाचे संस्थापक अध्यक्ष मिहीर गांधी यांनी दिली.

सन्मती सेवा दल ही जैन युवकांचे नेतृत्व करणारी सामाजीक संस्था आहे संस्थेने आजपर्यंत अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत. त्यात रक्तदान वारी काळात वारकऱ्यांना चहा अल्पोपहार आरोग्य तपासणी वृक्षारोपण ग्रामिण भागातील जैन बांधवावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडणे, जैन युवक संमेलने वधु वर मेळावे अर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या जैन बांधवांना औषोधपचार व शस्त्रक्रियेसाठी मदत तर जैनांची पवित्र भुमी असणाऱ्या समेद शिखर जी या तीर्थक्षेत्रावरील पहाड स्वछता यांचा समावेश आहे. संस्थेच्या या कार्याची दखल घेऊन त्याची गोल्डन बुक ऑफ वल्ड रेकॉर्ड मधे नोंद झाली आहे. 

चालु वर्षी पुणे सातारा सोलापूर उस्मानाबाद व अहमदनगर या पाच जिल्हातील सुमारे शंभर जैन मंदीर व परिसर स्वछता करण्याचा महत्वपुर्ण उपक्रम हाती घेतल्याचे गांधी यांनी सांगितले. या पाच जिल्हयात तेराशे सभासद असुन मोहीम सुरू झाल्यापासून निरा टेंभुर्णी सोलापूर व अकलुज येथील किर्ती स्तंभाची स्वछता केली असुन, उर्वरीत ठिकाणी हे काम युद्व पातळीवर सुरू आहे. यावेळी सन्मती सेवा दलाचे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: temple cleaning campaign in mohol