मास्तरसोबत करायला गेला "शाळा' अन 

One million rupees stolen from a teacher
One million rupees stolen from a teacher

संगमनेर : शिक्षकासोबत त्यांच्याच घरी काम करणाऱ्या रोजंदारीवर काम करणाऱ्या गड्याने "शाळा' केली. थोडेथिडके नव्हे तर तब्बल दहा लाख रूपये लांबवले. मात्र, गड्याची ही शाळा पोलिसांनी उघडी पाडली. 


चोरास केली अटक 
तालुक्‍यातील देवगाव येथील सेवानिवृत्त शिक्षक बाबाजी लहानू राहाणे (वय 68) यांच्या घरातून एटीएम कार्ड चोरून, त्यांच्या बॅंक खात्यातून 10 लाख 33 हजार रुपयांची चोरी करणाऱ्या परप्रांतीय आरोपीस अटक करण्यात आली. संगमनेर शहर पोलिसांना ही कामगिरी केली. राजेशसिंग बहादूरसिंग यादव (वय 35, रा. मुरकी खुर्द, तालुका मोहम्मदाबाद, जिल्हा गाजीपुर, उत्तर प्रदेश) असे त्याचे नाव आहे. 

दुध काढायला यायचा 
या बाबत अधिक माहिती अशी की, हा परप्रांतीय युवक तालुक्‍यातील देवगाव येथे एका दुकानात कामाला होता. या व्यतिरिक्त तो शिक्षक बाबाजी लहानू राहणे यांच्या घरी जनावरांचे दूध काढण्यासाठी येत असे. तेथेच त्याची मुक्कामाचीही व्यवस्था होती. त्याने 3 सप्टेंबर 2019 रोजी त्यांच्या घरातून एटीएम कार्ड चोरून नेले. या एटीएम कार्डचा पासवर्ड लक्षात राहण्यासाठी शिक्षक रहाणे यांनी कार्डवर मागील बाजूस नोंदवला होता. त्यामुळे आरोपीचे काम सोपे झाले होते. 

पासवर्ड होता कार्डवरच 
या कार्डची चोरी झाल्याची व त्यातून मोठी रक्कम चोरीली गेल्याची माहिती राहाणे यांना सोमवार ( ता. 20 ) रोजी मिळाल्यानंतर त्यांचे धाबे दणाणले. या बाबत त्यांनी संगमनेर शहर पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. 

पेट्रोल पंपावर चालविले कार्ड 
पोलिसांनी त्यांच्या घरी जाणे-येणे असणाऱ्या व्यक्तींची माहिती संकलित केली. त्यानुसार परप्रांतीय कामगार राजेशसिंग यादव याच्यावर पोलिसांचा संशय बळावला. सुमारे दीड महिन्यापासून तो देवगाव येथून बेपत्ता होता. त्यामुळे पोलिसांनी त्याला केंद्रबिंदू करून त्याच्या उपलब्ध मोबाईल क्रमांकावर त्याच्या मित्राला फोन करायला सांगून त्याला मंगळवार (ता. 21) रोजी अकोले नाक्‍यावर बोलावून घेत मुसक्‍या आवळल्या. 
त्याने कमिशनचे आमिष दाखवून एका पेट्रोल पंपावरून कार्ड स्वाइप करून काही रक्कम काढल्याचे व नंतर एटीएम मधून दररोज 40 हजार रुपये प्रमाणे पैसे काढल्याची कबुली दिली. 

पोलीस कोठडी 
आज त्याला संगमनेर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर हजर केले असता, 27 तारखेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश मिळाला. पोलिस निरीक्षक अभय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रोहिदास माळी पुढील तपास करीत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com