शनैश्वराच्या दर्शनाला दहा लाख भावीकांची गर्दी

सुनील गर्जे 
शनिवार, 11 ऑगस्ट 2018

नेवासे : शनीआमावस्येनिमित्त श्री क्षेत्र शनिशिंगणापूर (ता. नेवासे) येथे शनिवार (ता. 11) रोजी सुमारे दहालाख शनीभक्तांनी भगवान शनैश्वरचे दर्शन घेतले. शनिदर्शन घेतले. आज शनिआमवश्या व उद्या रविवार सुट्टी असल्याने भाविकांची गर्दी वाढतच आहे.

नेवासे : शनीआमावस्येनिमित्त श्री क्षेत्र शनिशिंगणापूर (ता. नेवासे) येथे शनिवार (ता. 11) रोजी सुमारे दहालाख शनीभक्तांनी भगवान शनैश्वरचे दर्शन घेतले. शनिदर्शन घेतले. आज शनिआमवश्या व उद्या रविवार सुट्टी असल्याने भाविकांची गर्दी वाढतच आहे.

आमवश्याच्या आदल्या दिवशी शुक्रवारीच शनिभक्तांनी भगवान शनैश्वराच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. शनी आमवस्याचे निमित्त पहाटेच औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे, पद्मश्री डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. डी पाटील, उद्योजक जयेश शहा, राहुल हेगडे यांच्या हस्ते महापूजा व आरती झाली. तसेच आज माजी महसुलमंञी एकनाथ खडसे, माजी मंञी बबन पाचपुते, माजी आमदार शंकरराव गडाख, आमदार राहुल जगताप, आमदार शिवाजी कर्डिले, आमदार बाळासाहेब मुरकुटे, आमदार भाऊसाहेब कांबळे, माजी आमदार विलास लांडे आदींनी शनिदर्शन घेतले. देवस्थानच्या वतीने यासर्वांचे स्वागत करुन सत्कार करण्यात आला.

दरम्यान भाविकांच्या वाढत्या गर्दीने परिसर फुलुन गेला होता. मुख्य मंदिरापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर वाहनतळ करण्यात आले आहे. देवस्थानच्या वतीने वाहनतळ, पिण्याचे पाणी, आरोग्याची व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांच्या वाढत्या गर्दीमुळे आज चौथऱ्यावरील दर्शन बंद करण्यात आले होते.

आज दिवसभरात विविध राज्यातील भाविकांनी महाप्रसादाचे आयोजन केले होते. शेवगाचे उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांच्या मार्गदर्शनाखाली शनिशिंगणापुरच्या सहायक पोलिस निरीक्षक संगीता राऊत, सोनईचे सहायक पोलिस निरीक्षक किरण शिंदे, नेवाशाचे सहायक पोलिस निरीक्षक डॉ. शरद गोर्डे यांनी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवला होता. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ten lakh crowd in shani shingnapur