महापौर पती संभाजी कदमसह दहा जण पोलिसांना शरण 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 मे 2018

नगर : केडगाव दुहेरी हत्याकांडानंतर झालेल्या दगडफेक व तोडफोडीच्या गुन्ह्यातील आरोपी महापौर सुरेखा कदम यांचे पती संभाजी कदम यांच्यासह दहा जण आज कोतवाली पोलिसांना शरण आले. महापौर सुरेखा कदम यांचे पती संभाजी कदम, शिवसेना महिला आघाडीच्या आशा निंबाळकर यांच्यासह दहा जणांचा आरोपीमध्ये समावेश आहे.

महापालिका पोटनिवडणुकीच्या निकालांनतर केडगाव येथे शिवसेनेचे उपशहरप्रमुख संजय कोतकर व वसंत ठुबे यांची निर्घृण हत्या झाली. त्यानंतर संतप्त शिवसैनिक व जमावाने केडगाव परिसरात दगडफेक करून वाहनांची तोडफोड केली. पोलिसांच्या वाहनांची तोडफोड करून त्यांना शिवीगाळ धक्काबुक्की केली. याप्रकरणी सहायक फौजदार लक्ष्मण हंडाळ यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिस ठाण्यात माजी आमदार अनिल राठोडसह सहाशे जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. आतापर्यंत अनेक आरोपींना अटक झालेली असून, त्यांना जामीन झालेला आहे. मात्र, माजी आमदार अनिल राठोड अद्यापपर्यंत पोलिसांना सापडलेले नाहीत. 

Web Title: ten people surrendered to police with mayor husband sambhaji kadam