समृद्धीची चटका लावणारी एक्‍झिट..!

समृद्धीची चटका लावणारी एक्‍झिट..!

कोल्हापूर - उन्हाळा ... सुटीचे दिवस. वडिलांबरोबर तीही गेली काही दिवस रंकाळा येथील खणीवर पोहायला जात होती. आज सकाळी आठच्या सुमारास ती पाण्यात उतरली. काही अंतर गेल्यानंतर तिच्या नाका-तोंडात पाणी गेल्याने अस्वस्थ वाटू लागले.  उपचारासाठी साऱ्या मंडळींनी ‘सीपीआर’मध्ये धाव घेतली; पण उपचारापूर्वीच तिची प्राणज्योत मालवली.

समृद्धी अमित सूर्यवंशी (वय १०, रा. माधवप्रेम अपार्टमेंट, मोहिते मळा, देवकर पाणंद) हिच्या या चटका लावणाऱ्या एक्‍झिटनं साऱ्यांनाच धक्का बसला.

दरम्यान, सूर्यवंशी कुटुंबीयांनी दुःखातून सावरत तिचे मरणोत्तर नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला आणि पुढची प्रक्रियाही पूर्ण केली.

समृद्धी घरातील मोठी मुलगी. तिला एक छोटी बहीणही आहे. वडील एका खासगी कंपनीमध्ये अधिकारी आहेत. पोरे एज्युकेशन सोसायटीच्या शिशुकुंज बालमंदिरातून ती नुकतीच चौथी उत्तीर्ण होऊन आता पाचवीला प्रवेश घेणार होती. मात्र, तत्पूर्वीच सूर्यवंशी कुटुंबीयांना या अनपेक्षित धक्‍क्‍याला सामोरे जावे लागले. मृत्यूनंतर तिच्या स्मृती कायम चिरंतन ठेवण्यासाठी कुटुंबीयांनी तिचे नेत्रदान केले. 

बोलकी अन्‌ सभाधीटही..!
समृद्धी अतिशय लाघवी स्वभावाची. बोलकी-बडबडी आणि विविध स्पर्धा व कार्यक्रमांत सळसळत्या उत्साहानं तिचं सहभागी असणं, या गोष्टींमुळं तिचा सर्वांनाच लळा. वाचनाची तर तिला इतक्‍या लहान वयातच प्रचंड आवड होती. शिव-शाहू विचारांची भाषणं असोत किंवा विविध कलाविष्कारांतही ती अग्रभागी असायची.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com