पत्नीच्या खूनप्रकरणी दहा वर्षे सक्तमजुरी 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 एप्रिल 2018

सातारा - पत्नीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी डबेवाडी (ता. सातारा) येथील दीपक महादेव माने (वय 40) याला आज पाचवे जिल्हा व सत्र न्यायाधीश वाय. एच. अमेठा यांनी दहा वर्षे सक्तमजुरी व तीन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. 

दीपक डबेवाडी येथे पत्नी वंदना आणि दोन मुलींसोबत राहत होता. त्याला दारूचे व्यसन होते. कामधंदा करत नसल्यामुळे त्याचा पत्नीशी सतत वाद होत होता. त्यातून तो त्यांना मारहाण करायचा. 

आठ फेब्रुवारी 2017 रोजी दुपारी दीपक दारूच्या नशेत घरी आला. नशेत असूनही त्याने वंदना यांच्याकडे दारूसाठी पैसे मागितले. नकार दिल्याने त्याने त्यांना काठीने मारहाण केली. त्यात त्या बेशुद्ध पडल्या. मुलगी तृप्ती हिने त्यांना ग्रामस्थांच्या मदतीने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे त्यांनी दिलेल्या जबाबानुसार दीपकवर मारहाणीचा गुन्हा दाखल झाला. मात्र, उपचारादरम्यान वंदना यांचा मृत्यू झाला. त्यामुळे दीपकवर खुनाचा गुन्हा दाखल झाला. 

तालुका पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक चेतन मछले यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. खटल्यामध्ये एकूण पाच  जणांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार मुलगी तृप्ती हिची साक्ष महत्त्वाची ठरली. साक्षी व सहायक सरकारी वकील ज्योती दिवाकर यांचा युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायाधीश अमेठा यांनी दीपकला आज शिक्षा ठोठावली. सरकारी वकिलांना प्रॉसिक्‍यूशन स्कॉडचे हवालदार अविनाश पवार, शमशुद्दीन शेख, अजित शिंदे, नंदा झांजुर्णे व शुभांगी वाघ यांनी सहकार्य केले.

Web Title: Ten years of persecution for wife murder satara news