यंदाच्या डीएसआरने निविदा काढा

विकास कांबळे
शुक्रवार, 16 डिसेंबर 2016

कोल्हापूर - पाणीपुरवठ्याच्या कामाची निविदा गेल्या वर्षीपेक्षा चालू वर्षीच्या डीएसआरने (वार्षिक दर सुची)  काढल्यास जिल्हा परिषदेची बचत होईल, असा आग्रह वित्त अधिकारी गणेश देशपांडे यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे धरल्यामुळे आळते (ता. हातकणंगले) पाणीपुरवठा योजनेचे फेरअंदाजपत्रक सादर करण्याच्या सूचना दिल्या. नवीन डीएसआरने प्रस्ताव केल्यामुळे त्यात तीस-चाळीस लाखांची वाढ झाली. आपला सल्ला चुकीचा असल्याचे लक्षात आल्यानंतर जुन्याच प्रस्तावाला श्री. देशपांडे यांनी मान्यता दिली. त्यांच्या या ‘सल्ल्यामुळे’ पाणीपुरवठा योजनेच्या कामाच्या मंजुरीसाठी मात्र काही कालावधी जाणार आहे.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांची ही पहिलीच ‘पोस्टिंग’ आहे. आयएएस झाल्यानंतर प्रथमच ते जिल्हा परिषदेचे काम पाहत आहेत. त्यामुळे त्यांना काम समजून घ्यावे लागत आहे. त्यासाठी ते अधिकाऱ्यांवर विश्‍वास ठेवतात; पण काही अधिकारी त्यांची कशी दिशाभूल करतात, त्याचे आळते पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा उत्तम उदाहरण आहे.

निवडणुका जवळ आल्यामुळे एकीकडे सदस्य मतदारसंघातील कामे लवकर पूर्ण करून घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत; पण त्याला जिल्हा परिषदेतील अधिकारी खो घालण्याचा प्रयत्न करत असतात. आळते येथील पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा प्रस्ताव तयार झाला. या कामाचे अंदाजपत्रक गेल्या वर्षाच्या दराने तयार केले. अपवादात्मक वस्तू सोडल्या तर बहुतांशी वस्तूंचे दर वाढतच असतात. असे असतानाही या कामाची फाइल वित्त अधिकारी गणेश देशपांडे यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी त्यावर ‘गेल्या वर्षीच्या डीएसआरने प्रस्ताव सादर केल्यास यात जिल्हा परिषदेची बचत होईल,’ असे मत नोंदविले आणि निर्णयासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे पाठविले. त्यामुळे त्यांनीही देशपांडे यांच्या मतानुसार फेरप्रस्ताव सादर करण्यास सांगितले.

कामाला उशीर होत असल्यामुळे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे अरुण इंगवले यांनी त्यासंदर्भात माहिती घेतली. त्यांना हा सगळा प्रकार समजल्यानंतर त्यांनी देशपांडे यांच्याशी चर्चा केली. या वेळी इंगवले यांनी त्यांना ‘साहेब’ वस्तूंचे दर वाढत जातात, त्यामुळे नवीन प्रस्ताव केला तर रक्‍कम वाढणार पण कमी होणार नाही, असे सांगितले. तरीही देशपांडे यांनी फेरप्रस्ताव सादर करण्याचा आग्रह धरला. त्यात जवळपास चाळीस लाख रुपये वाढले. त्यानंतर मात्र देशपांडे यांनी कागदावर लिहिलेली टिपणी खोडली आणि जुन्या दरानेच निविदा काढण्यास मान्यता दिली. त्याची चर्चा जिल्हा परिषदेत सुरू आहे.

आपल्या मतदारसंघातील म्हणण्यापेक्षा गावच्या पाणीपुरवठा योजनेचे काम होते, याबाबत वित्त अधिकारी श्री. देशपांडे यांना फेरप्रस्ताव सादर केल्यास किंमत वाढेल, असे सांगितले होते, तरीही त्यांनी आपला आग्रह कायम ठेवला. त्यामुळे जे व्हायचे तेच झाले. अधिकाऱ्यांच्या या वृत्तीमुळेच कामांना विलंब होतो.
- अरुण इंगवले, जि. प. सदस्य

Web Title: tender on dsr