अखेर महापौरांनी लावला शोध ; काम एकच अन् निविदा दोन

Tender of Municipal Corporation and MSEDCL sangli marathi news
Tender of Municipal Corporation and MSEDCL sangli marathi news

सांगली : काम एकच मात्र महापालिका आणि महावितरण अंदाजित दरपत्रके मात्र वेगवेगळी. त्यात फरक थोडा थोडका नव्हे तर तब्बल 35 लाखांचा. महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी हा शोध लावला. काम आहे वसंतदादा सूतगिरणी ते कुपवाड या रस्त्यावरील पोल शिफ्टिंग कामाचे. महावितरणचे अंदाजपत्रक आहे. 45 लाखांचे, तर महापालिकेचे 80 लाखांचे. आता महापौरांनी या वेगवेगळ्या खर्चामागचे महा "ज्ञान' समजून घेण्यासाठी दोन्हीकडील अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेतली. 

सूतगिरणी ते कुपवाड पाण्याच्या टाकीपर्यंतच्या रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. या रस्त्यावरील विजेचे खांब रस्त्याबाहेर शिफ्ट करावे लागणार आहेत. महावितरण आणि महापालिका यांच्यातील अंदाजपत्रकीय किमतीत जवळपास दुप्पटीचा फरक आहे. एवढी तफावत असेल तर हे काम महावितरणकडूनच केलेले बरे असं महापौर म्हणाले. 

कुपवाड पाण्याची टाकीपासूनपुढे 600 मीटर रस्ता कामाचे एस्टीमेट सादर करा, अशी सूचना महापौरांनी अधिकाऱ्यांना दिली. कुपवाड एमआयडीसी येथे महापालिकेच्या अग्निशमन दलाचे वाहन आहे. पुरेसे मनुष्यबळ नसल्याने हे वाहन सायंकाळी मिरजेला हलवले जाते. पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून हे वाहन कुपवाड येथे कायमस्वरुपी राहील. त्यासंदर्भात कार्यवाही होईल, असे सूर्यवंशी यांनी सांगितले. सूर्यवंशी यांच्या सूचनेवरून कुपवाड येथील महापालिकेच्या जुन्या कार्यालयात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. 

असाही योगायोग 
या रस्त्याच्या रुंदीकरणाच्या एकाच कामाच्या एकाचवेळी दोन निविदा महापालिका आणि बांधकाम विभागाने प्रसिद्ध करण्याचा "चमत्कारिक योगायोग' घडला होता. तत्कालीन उपमहापौर विजय घाडगे यांनी ही बाब लक्षात आणून दिली होती. यातला आणखी एक योगायोग म्हणजे दोन्हीकडील कामे एकाच ठेकेदाराने घेतली होती. ही बाब लक्षात आली नसती तर ठेकेदारांची चंगळच झाली असती.  
 

संपादन- अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com