पवार-फडणवीसांच्या भेटीमुळे कार्यकर्ते गळफास लावण्याच्या तयारीत

पवार-फडणवीसांच्या भेटीमुळे कार्यकर्ते गळफास लावण्याच्या तयारीत

पंढरपूर - निरा देवधर धरणाचे बारामती इंदापूर तालुक्यासाठी दिलेले नियमबाह्य पाणी बंद करून ते लाभ क्षेत्रातील सांगोला माळशिरस फलटण भोर पंढरपूर या दुष्काळी भागासाठी द्यावे या मागणीसाठी सांगोला तालुक्यातील शेतकर्यांच्या वतीने फाशी आंदोलन करण्यात आले.

निरा देवधर धरणातून निरा डाव्या कालव्यातून बारामतीला 60 अतिरिक्त पाणी देण्याचा ठराव तत्कालीन जलसंपदामंत्री अजित पवार यांच्या काळात घेण्यात आला होता. त्याची मुदत 2017 साली संपून देखील नियमबाह्यपणे पाणी सुरूच होते. याविषयी भाजप खासदार रणजितसिंह नाईक निबाळकर यांनी बेकायेशीर पाणी बंद करून ते दुष्काळी भागाला देण्याची मागणी जलसंपदामंत्री गिरिश महाजन यांच्याकडे केली होती. त्यावर मंत्री महाजन यांनी बारामतीचे पाणी बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

त्यानंतर माढा लोकसभा मतदार संघात पाणी प्रश्न चांगलाच पेटवला आहे. खासदार रणजितसिंह नाईक निबाळकर यांनी थेट राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांनाच आव्हान दिले आहे. यानंतर आज शरद पवार आणि अजित पवार हे देखील या प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पाणी बंद करून नये अशी मागणी करणार असल्याची माहिती मिळताच दुष्काळी भागातील शेतकर्यांमध्यू रोष निर्माण झाला आहे. त्यातून आमच्या हक्काचे पाणी बारामतीला  देऊ नये या मागणीसाठी येथील शेतकर्यांना झाडाला गळफास घेत आंदोलन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com