दहावीच्या विद्यार्थांना घेऊन जाणाऱ्या गाडीस तासगाव रोडवर अपघात

दहावीच्या विद्यार्थांना घेऊन जाणाऱ्या गाडीस तासगाव रोडवर अपघात

सांगली -  तासगाव रस्त्यावर कुमठे फाटा येथे दहावीचे विद्यार्थी घेऊन निघालेल्या मोटारीला छोटा हत्ती टेम्पोची धडक बसली. अपघातानंतर मोटार पलटी झाली. या अपघातात दहावीचे 14 विद्यार्थी जखमी झाले. त्यापैकी सहाजण गंभीर जखमी आहेत.

आज दुपारी अडीचच्या सुमारास हा अपघात झाला. जखमींना सिव्हील रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. कुमठे हायस्कुलच्या दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा कवलापुर येथील पंडीत नेहरु विद्यालयात आजपासून सुरु झाली आहे. आज पहिला मराठीचा पेपर होता. गावातील विद्यार्थी मोटारमधुन कवलापुरला आले होते. पेपर संपल्यानंतर सर्वजण घराकडे निघाले होते. तेंव्हा वाटेत त्यांच्या गाडीला अपघात झाला.

अपघातातील जखमींची नावे अशी : आदित्य काशिनाथ पाटील (16), आकाश संजय पाटील (16), वेदांत दादासो पाटील (16), शुभम रमेश भोसले (16), ऋतुराज आनंदा भंडारी (16), सुमित सुखदेव गावडे (35), प्रशांत प्रभाकर पाटील (35), लक्ष्मण पवार (40)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com