'टीईटी' परीक्षा 19 जानेवारीला

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 नोव्हेंबर 2019

- पहिला पेपर 19 जानेवारीला सकाळी साडेदहा ते एक तर दुसरा पेपर दुपारी दोन ते साडेचार या वेळेत होणार आहे.

सोलापूर : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) घेण्याची जबाबदारी शासनाने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेवर दिली आहे. त्यानुसार यंदाची "टीईटी' परीक्षा ही 19 जानेवारीला होणार आहे.

- शिक्षणाची आस.. समाज बदलाचा ध्यास

पहिली ते पाचवी व सहावी ते आठवीच्या सर्व व्यवस्थापनाच्या, सर्व माध्यमांच्या, अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित शाळांमध्ये शिक्षण सेवकांची भरती केली जाते. त्यासाठी उमेदवारांना "टीईटी' परीक्षा बंधनकारक केली आहे. या परीक्षेसाठी पात्र उमेदवारांनी उद्यापासून (शुक्रवार) आपला अर्ज ऑनलाइन भरायचा आहे. 28 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारांना ऑनलाइन अर्ज भरता येणार आहे.
‘‘आम्ही आता शाळेला जाणार, आम्हाला शिकायचं आहे...’

ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर त्यांना चार ते 19 जानेवारी या कालावधीत प्रवेशपत्र ऑनलाइन प्रिंट काढून घेता येणार आहे. या परीक्षेचा पहिला पेपर 19 जानेवारीला सकाळी साडेदहा ते एक तर दुसरा पेपर दुपारी दोन ते साडेचार या वेळेत होणार आहे.

"ते' आता होणार हेडमास्तर..

प्रवेशासंबंधीची सर्व माहिती परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांनी ती माहिती पाहून ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: TET exam held on 19 January 2020