वस्त्रोद्योगाला गती देण्याची धमक कॉंग्रेसकडेच - राणे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 नोव्हेंबर 2016

इचलकरंजी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे थापा मारण्याचे काम करतात. प्रत्यक्षात ते कोणतीही कृती करत नाहीत. इचलकरंजीचा वस्त्रोद्योग 40 टक्के ठप्प झाला आहे. उद्योगाला गती देण्याची धमक कॉंग्रेस पक्षाकडेच आहे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केले.

कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व राजर्षी शाहू विकास आघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार रवी रजपुते व नगरसेवकपदाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत ते बोलत होते. माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे अध्यक्षस्थानी होते. माजी गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांची उपस्थिती होती.

राणे म्हणाले, 'वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील, पृथ्वीराज चव्हाण आदी मुख्यमंत्र्यांना मी जवळून पाहिले आहे. मात्र, धादांत खोटे बोलणारा फडणवीस यांच्यासारखा मुख्यमंत्री मी पाहिलेला नाही. दोन वर्षांमध्ये त्यांनी कोणतीही कामे केलेली नाहीत. एक रुपयाचाही रोजगार महाराष्ट्रात आलेला नाही. सरकार गतिमान आहे, असे सांगितले जाते. संगणकाच्या माध्यमातून गाव जोडण्याची भाषा केली जाते. महागाई वाढली आहे. रोजगार नसल्यामुळे लोकांना कामावरून काढले जात आहे. फडणवीस यांच्या सरकारमध्ये 14 मंत्री भ्रष्ट आहेत. शिवसेना ही बाळासाहेबांची शिवसेना राहिलेली नाही.''

Web Title: textile business speed power to congress