कापड उद्योग वाचवण्यासाठी मुंबईत केंद्राची स्थापना

विजय गायकवाड
मंगळवार, 10 एप्रिल 2018

वातावरण बदलाचे संकट वाढलेय असे सांगच पाशा पटेल यांनी दुष्काळ आणि अतिवृष्टीचे संकटाचा सामना करावा लागतोय असे सांगितले. वस्त्रोद्योग आयुक्त कविता गुप्ता यांनी सत्य, स्वच्छ, आणि श्रेष्ठ कापूस इजिप्त उद्योगासारखा व्हावा असे सांगितले. शेतकरी आमचा केंद्रबिंदु असून त्याला केंद्रस्थानी ठेऊनच शेतकरी उत्पन्न दुप्पट होऊ शकते, असे सांगितले.

मुंबई : भारतातील कापड उद्योग संक्रमण अवस्थेतून जात असताना वस्त्रोद्योगातील महत्त्वपूर्ण घटक असलेल्या कापूस उत्पादकांसाठी वर्षाला २५ लाख खर्चून प्रशिक्षण केंद्र उभारण्याची घोषणा कॉटन असोसिएशनचे अध्यक्ष अतुल गणात्रा यांनी केली.

'कापूस उद्योगापढील आव्हाने' या विषयावरील परिषदेच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. यावेळी कृषीमुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, वस्त्रोद्योग आयुक्त डॉ. कविता गुप्ता, अर्थतज्ञ जी. चंद्रशेखर उपस्थित होते.

अतुल गणात्रा म्हणाले, देशात १७२ लाख हेक्टर कापूस लागवड असून ३६० लाख बेल्स उत्पादन अपेक्षित आहे. महाराष्ट्रात ८० लाख बेल्स उत्पादन अपेक्षित आहे. कापड उद्योग सध्या प्रतिकुल परिस्थितीतून जात असल्याचे सांगत त्यांनी कापूस उत्पादक शेतकरी या उद्योगातील सर्व्हिस महत्त्वाचा घटक असल्याचे सांगितले.

शेतकरी प्रशिक्षणासाठी मुंबईच्या कॉटन असोसिएशन मुख्यालयात दोन केंद्र उभारण्यात येतील. सुरवातीच्या वर्षाला २५ लाखाचा खर्च करणार असून पाच वर्षात १.५ कोटी खर्च करण्यात येतील, असे गणात्रा यांनी जाहीर केले. 

कृषिमुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल म्हणाले, सोयाबीनचे दर वाढले तर कापूस लागवड कोण करणार? कापूस उद्योजक आत्महत्या करतील. सत्यप्रतीचा आणि स्वच्छ कापूस घेण्यासाठी कापड उद्योगाने शेतकऱ्यांना सोबत घ्या. उद्योगाने धाडसी शेतकऱयांना मदत करा. शेतकरी उद्योगाला हवे ते देईल.

वातावरण बदलाचे संकट वाढलेय असे सांगच पाशा पटेल यांनी दुष्काळ आणि अतिवृष्टीचे संकटाचा सामना करावा लागतोय असे सांगितले. वस्त्रोद्योग आयुक्त कविता गुप्ता यांनी सत्य, स्वच्छ, आणि श्रेष्ठ कापूस इजिप्त उद्योगासारखा व्हावा असे सांगितले. शेतकरी आमचा केंद्रबिंदु असून त्याला केंद्रस्थानी ठेऊनच शेतकरी उत्पन्न दुप्पट होऊ शकते, असे सांगितले.

Web Title: textile industry in Maharashtra