छानच की...बी-हेवी मोलॅसिसपासून आता इथेनॉल निर्मिती

तात्या लांडगे
बुधवार, 4 डिसेंबर 2019

- राज्यातील 15 कारखान्यांना राज्य उत्पादन शुल्कची परवानगी
- वारणा कारखाना थेट उसापासून करणार इथेनॉल
- साखर व्रिकी होत नसल्याने अल्कोहोल निर्मितीकडे कारखान्यांचा कल
- राज्यातील 143 पैकी 68 कारखान्यांचेच गाळप सुरु

सोलापूर : साखरेचे अतिरिक्‍त उत्पादन टाळून इंधन निर्मितीस वाव मिळावा, या उद्देशाने राज्य उत्पादन शुल्क विभागाने राज्यातील 15 साखर कारखान्यांना बी-हेवी मोलॅसिसपासून इथेनॉल निर्मितीला प्रथमच परवानगी दिली आहे. नऊ कोटी 85 लाख 47 हजार 581 लिटर इथेनॉल निर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

 

हेही आवर्जुन वाचाच... तासिका प्राध्यापकांच्या खाद्यांवर उत्तरपत्रिकांचे ओझे

राज्यातील 119 कारखान्यांमधून 161 कोटी 92 लाख लिटर अल्कोहोल निर्मिती केली जाते. तर 117 साखर कारखान्यांकडे इथेनॉल निर्मितीचे प्रकल्प असून त्यांची 164 कोटी 11 लाख लिटरची क्षमता आहे. बी-हेवी मोलॅसिसला साडेदहा रिकव्हरी असलेल्या कारखान्यांमधून एक टन उसापासून 105 किलो साखर अन्‌ 320 लिटर इथेनॉल तयार होत असल्याने यंदा कारखान्यांना तशी परवानगी देण्यात आली आहे. तत्पूर्वी, राज्यात आठ लाख 22 हजार हेक्‍टरवर गाळपासाठी ऊस शिल्लक असून त्यातून पाच लाख 18 हजार मेट्रिक टन उसापासून 58 लाख टन साखर निर्मिती होईल, असा अंदाज साखर आयुक्‍तालयाने व्यक्‍त केला आहे. मात्र, राज्यातील 143 साखर कारखान्यांपैकी आतापर्यंत 68 साखर कारखान्यांचेच गाळप सुरू झाले, असेही आयुक्‍तालयातून सांगण्यात आले.

 

हेही आवर्जुन वाचाच... अबब...729 जागांसाठी सव्वातीन लाख उमेदवार

या कारखान्यांना मिळाली परवानगी
श्री दत्त इंडिया (सांगली), किसनवीर (भुईंज), श्रीनाथ मस्कोबा (पुणे), दौंड शुगर (पुणे), जकराया, युटोपियन (सोलापूर), संजीवनी कारखाना (नगर), व्ही. व्ही. पाटील (प्रवरानगर), अंबालिका (नगर), सातपुडा-तापी (नंदुरबार), अंबेजोगाई (बीड), माजलगाव, वैद्यनाथ (बीड), विकास कारखाना (लातूर), सागर वाईन डेक्‍कन (यवतमाळ).
-
वारणा कारखान्याची थेट उसापासून इथेनॉल निर्मिती
वारणा येथील तात्यासाहेब कोरे साखर कारखाना प्रथमच थेट उसापासून इथेनॉलची निर्मिती करणार आहे. थेट उसापासून तयार केलेल्या इथेनॉलला प्रतिलिटर 59 रुपये 48 पैसे इतका दर देण्यात आला आहे. 26 लाख 81 हजार 739 लिटर इथेनॉल निर्मितीचे उद्दिष्ट या कारखान्याला देण्यात आले आहे. थेट उसापासून इथेनॉल तयार करणारा हा राज्यातील पहिलाच कारखाना ठरला आहे.
 

हेही आवर्जुन वाचाच... खुषखबर...! या शहरात येणार 100 कृषी हवामान शास्त्रज्ञ

 

शेतकऱ्यांना एफआरपी देण्यास अडचणी
राज्य उत्पादन शुल्क विभागाने प्रथमच बी-हेव्ही मोलॅसिसपासून इथेनॉल निर्मितीला परवानगी दिली आहे. बी-हेव्ही इथेनॉलला प्रतिलिटर 54 रुपये 27 पैसे असा दर आहे. मात्र, साखरेला उठाव नाही, विक्रीचा कोटा मर्यादित असल्याने शेतकऱ्यांना एफआरपी देण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे अनेक कारखान्यांचा कल अल्कोहोल निर्मितीकडेच आहे.
- उमेश परिचारक, अध्यक्ष, युटोपियन कारखाना, मंगळवेढा
 

 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: That's right ... Ethanol production now from B-Heavy Molasses