दुकानाचे शटर उचलून ४ लाखांचा माल चोरी

bhose village
bhose village

भोसे(सोलापूर) : येथील संजय श्रीमंत काटकर यांचे दत्त क्लोथ सेंटर हे चोरट्याने काल रात्री दुकानाचे शटर उचलून सुमारे ४ लाखांचा माल चोरून नेला. चोरी प्रकरणाने या परिसरातील नागरिक आणि छोट्या व्यावसायिकात घबराटीचे वातावरण पसरले आहे

याबाबत सविस्तर माहिती अशी की, भोसे येथील दत्त क्लोथ सेंटर हे कापड दुकान प्रकाश पाटील यांचे शॉपिंग सेंटर मध्ये असून (ता.२०) ऑक्टोबरला संजय काटकर यांनी रात्री बंद केले केल्यानंतर आज पहाटे ४ वाजता कापड दुकान फोडले असल्याचा त्यांना गावातून फोन आला. तात्काळ घटनास्थळी येवून पाहिले असता दुकानातील साड्या व इतर माल असा ४ लाखांचा माल चोरून नेला असल्याचा अंदाज संजय काटकर यांनी व्यक्त केला. 

दरम्यान सपोनी महेश विधाते पथकासह घटनास्थळी दाखल झाले असून सध्या श्वानपथकाला व ठसे तज्ञालाही पाचारण करण्यात आले आहे. सध्या गस्ती पथकासह ग्रामरक्षक दल सक्रिय करावे अशी मागणी होत आहे. पोलिसांनी या परिसरातील इतर दुकानातील सीसीटीव्ही फूटेज तपासून पाहिले आहे. चोरटे चार चाकी वाहनातून आले असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. तसेच चोरी करून दुकानाच्या पाठीमागील शेतात नेऊन तेथे एकत्र करून चारचाकी वाहनातून चोरटे पळून गेले आहेत.

 मंगळवेढा दक्षिण भागात नंदेश्वर पोलीस ठाण्याची अद्ययावत इमारत तयार असताना केवळ या बीटखालील कर्मचारी नदेश्वर येथे रहात नसलेने व मंगळवेढा पोलीस ठाणे व दक्षिण भागातील अंतर जास्त असलेने वारंवार चोऱ्या, चोरटी वाळू वाहतूक, गुटखा वाहतूक असे प्रकार सातत्याने घडत असल्यामुळे जिल्हा पोलीस प्रमुखांनी दक्षिण भागासाठी स्वतंत्रपणे नंदेश्वर पोलीस ठाणे सुरू करून दक्षिण भागातील वारंवार घडणाऱ्या अशा घटनांना आळा घालण्याची मागणी होत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com