रस्तालुटीच्या तयारीतील तिघे ताब्यात, दोघे पसार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 मे 2018

लोणी खुर्द येथील महेश भाऊसाहेब भागवत (वय 28), सचिन भाऊसाहेब ढोबळे (वय 30) व सागर रावसाहेब राक्षे (वय 23) अशी आरोपींची नावे आहेत.

लोणी - लोणी ते गोगलगाव रस्त्यावरील जनावरांच्या बाजारतळाजवळ रस्तालुटीच्या तयारीत असलेल्या तीन संशयित आरोपींना पोलिसांच्या गस्तीपथकाने ताब्यात घेतले. त्यांच्याजवळ गावठी पिस्तूल, चाकू आणि मिरचीपूड आढळून आली. लोणी खुर्द येथील महेश भाऊसाहेब भागवत (वय 28), सचिन भाऊसाहेब ढोबळे (वय 30) व सागर रावसाहेब राक्षे (वय 23) अशी आरोपींची नावे आहेत. याबाबत पोलिस कॉन्स्टेबल अनिल गवांदे यांच्या फिर्यादीवरून लोणी पोलिसांनी गुन्हा नोंदविला. 
    
गोगलगाव रस्त्यावर काल (शनिवारी) मध्यरात्री गस्त घालताना पोलिसांना पाच तरुण दबा धरून बसल्याचे दिसले. संशय आल्याने चौकशी केली असता, त्यांच्याकडे गावठी पिस्तूल व एक जिवंत काडतूस, तसेच मिरचीपूड आणि चाकू आढळून आला. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले; मात्र अंधाराचा फायदा घेऊन त्यांच्यापैकी दोघे पसार झाले. ता. राहाता न्यायालयाने आरोपींना तीन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Theft Arrested in Loni Khurd