चाकूचा धाक दाखवून आठ घरफोड्या

चाकूचा धाक दाखवून आठ घरफोड्या

कुपवाड - येथील अष्टविनायक कॉलनीतील मध्यवस्तीतील चाळीत मध्यरात्री सराईत चोरट्यांनी धुमाकूळ घातला. चाकूचा धाक दाखवून आठ ठिकाणी घरफोड्या केल्या. त्यांतील दोन ठिकाणांहून रोकड, मोबाइल असा २० हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी पळविला.

याप्रकरणी कुपवाड पोलिसांनी थरारक पाठलाग करून तिघांना अटक केली. रोहित सुदाम कदम (वय २०, अहिल्यानगर), शुभम राजाराम गोसावी (वय २१, अहिल्यानगर) व रोहित गणेश गोसावी (वय २३, रा. अहिल्यानगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. यांतील दोघे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याचा साथीदार शैलेश पडळकर पसार आहे.

अहिल्यानगरच्या उत्तरेकडील बाजूला अष्टविनायकनगर आहे. तेथे दोन चाळी आहेत. तेथे बाफन इंडस्ट्रीजमधील परप्रांतीय कामगार राहतात. शुक्रवारी (ता. २९) रात्री अकराच्या सुमारास चौघे चोरटे चाळीत आले. बबलू पटेल याच्या खोलीचा कडीकोयंडा उचकटून चाकूचा धाक दाखवत चोरी केल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर विनोद हरिकिशन निसाद यांच्या घरातील नऊ हजार आणि गोविंद जयसू  राम यांच्या घरातील आठ हजार आणि मोबाइल असा  वीस हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. आरडाओरडा झाल्यानंतर चोरट्यांनी पळ काढला. त्यानंतर पुन्हा मध्यरात्री दोनच्या सुमारास चौघे चोरटे पुन्हा चाळीत आले. त्यांनी चाकूचा धाक दाखवत  यांच्यात घरफोडी केली. 

घरफोडीचा प्रकार निदर्शनास आल्यानंतर कुपवाड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक तपासात मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी चोरट्यांचा माग काढला. थरारक पाठलाग करून तिघांना ताब्यात घेतले. सखोल चौकशी केली असता, तिघांनी घरफोडी केल्याची कबुली दिली. पोलिस ठाण्यात मात्र, दोनच फिर्यादी दाखल केल्या. उपाधीक्षक संदीपसिंग गील  यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक संग्राम शेवाळे, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रवीण यादव, नितीन मोरे,  कृष्णा गोजारी, सचिन पाटील, महेश गायकवाड यांचा कारवाईत सहभाग होता. 

फोन आला, पण 
दरम्यान, चाळीत अकराच्या सुमारास चोरटे धुमाकूळ घालत असल्याबाबत भागातील नागरिकाने एका  पोलिसांना रात्री दूरध्वनीवरून संपर्क साधला. मात्र, त्यांच्याकडून त्यास उत्तर मिळाले नसल्याचे एका नागरिकाने पत्रकारांशी बोलतांना सांगितले. त्यामुळे चोरट्यांनी पुन्हा मध्यरात्री धुमाकूळ घातला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com