सोनाराच्या दुकानातून अडीच लाखाच्या दागिन्यांची बॅग लंपास 

चंद्रकांत देवकते
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

मोहोळ(सोलापूर) : सोने चांदीचे दुकान सकाळी उघडून साफसफाई करताना काउटंरवर ठेवलेली अडीच लाखाचे सोन्या चांदीचे दागिने असलेली बॅग अज्ञात चोरट्याने हातोहात चोरून नेल्याची घटना मोहोळ येथील गृरुकृपा ज्वेलर्स मध्ये( ता. १४) सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली.                         

मोहोळ(सोलापूर) : सोने चांदीचे दुकान सकाळी उघडून साफसफाई करताना काउटंरवर ठेवलेली अडीच लाखाचे सोन्या चांदीचे दागिने असलेली बॅग अज्ञात चोरट्याने हातोहात चोरून नेल्याची घटना मोहोळ येथील गृरुकृपा ज्वेलर्स मध्ये( ता. १४) सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली.                         

या बाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, येथील डॉ  बाबासाहेब आंबेडकर चौकात मेनरोडवर संजय श्रीहरी दीक्षित यांचे गुरुकृपा ज्वेलर्स नावाचे सोने चांदी विक्री व दुरुस्तीचे दुकान आहे . दररोज दुकान बंद करताना ते दुकानातील सर्व सोन्या-चांदीचे दागिने आपल्या सोबत घरी घेऊन जातात व सकाळी दुकान उघडण्याच्या वेळी पुन्हा घेऊन येत असतात. नेहमी प्रमाणे (ता.१४) त्यांचा मुलगा सुरज हा सोन्या-चांदीची बॅग घेऊन दुकान उघडण्यासाठी आला होता. सकाळी दहा वाजण्याच्या दरम्यान त्याने दुकानाचे शटर उघडून आत प्रवेश केला ,व साफसफाई करण्याचे काम सुरू केले.

त्या दरम्यान त्याने  सोबत असलेली सोन्याचांदीच्या दागिन्याची बॅग दुकानाच्या काऊंटर ठेवली होती. हातात झाडु घेऊन दुकान साफ करण्यास सुरुवात करण्यावेळीच नजर ठेऊन असलेल्या अज्ञात चोरटयाने  संधीचा फायदा घेत अडीच लाख रुपये किमतीचे सोने चांदीचे  दागिने असनारी बॅग घेऊन  तेथून पळ काढला. याप्रकरणी संजय श्रीहरी दिक्षित यांनी मोहोळ पोलिसात फिर्याद दिली असून अज्ञात चोरटयाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असुन अधिक तपास मोहोळ पोलिस करीत आहेत .

Web Title: theft jewelry bag worth 2.5 lakhs from the gold shops