कोपर्डे हवेलीमध्ये एकाच रात्री दोन वेगवेगळ्या ठिकाणी चोरी

कोपर्डे हवेलीमध्ये एकाच रात्री दोन वेगवेगळ्या ठिकाणी चोरी

कोपर्डे हवेली (क्ऱ्हाड) -कोपर्डे हवेली येथे शनिवारी रात्री वेगवेगळ्या दोन ठिकाणी एकच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी घरात घुसून जवळपास साडेतेरा तोळे लंपास केल्याची घटना शनिवारी रात्री घडली.

शनिवारी रात्री चोरट्यांनी रात्री साडेबाराच्या सुमारास कोपर्डेतील मुख्य रस्त्याच्या कडेलाच संगिता सुनील रसाळ यांच्या घरात चौघाजनांनी घुसून त्यांच्या गळ्यातील दिड तोळ्याची चैन हिसकावून घेऊन पळ काढला. दरम्यान गळ्यातील चैन ओढत असतानाच संगिता रसाळ जाग्या झाल्या परंतु डोळ्यावर बॅटरीची लाईट मारल्याने समोरचे काहीच लक्षात आले नाही तेव्हा संगिता रसाळ यांनी चैन ओढून धरली होती मात्र जोराचा हिसका दिल्याने चैन सोडली मात्र त्यांनी लगेच त्यांच्या हातात असलेली लोखंडी शिग (राॅड) त्यांनी पकडला आणि चैन मागितली परंतु त्यांनी शिग सोड नाहीतर आमच्याकडे चाकु आहे असे बोलल्यावर त्यांनी शिग सोडून दिली.

नंतर, चोरट्यांनी आपला मोर्चा प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या नजिक असलेल्या शिवाजी किसन साळवे यांच्या घराकडे वळवुन दाराची कडी काढून आत प्रवेश केला. घरातील सर्व जण झोपेत असताना आतल्या खोलीत असलेल्या कपाटाचे दार उघडून कपाटातील सुमारे बारा तोळ्याचे सुवर्ण अलंकार आणि दोन हजार रुपये रोख रक्कम गायब करून पोबारा केला.

दरम्यान पिंटु लोहार यांची गाडी घेऊन जाण्याचा प्रयत्न केला परंतु त्यामधील पेट्रोल संपल्याने गाडी कराड मसुर रस्त्यावर असलेल्या भवानीचा ओढा येथेच गाडी सोडून पसार झाले. चोरटयांनी आणखी दोन-तीन ठीकाणी चोरीचा प्रयत्न केला परंतु लोक जागी झाल्यामुळे त्यांचा प्रयत्न फसला. या घटनेची नोंद तालुका पोलिस स्टेशनला झाली असून पुढील तपास हवालदार लावंड करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com