तीस तोळे सोन्याची शिवथरमध्ये चोरी 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 जून 2018

शिवथर - शिवथर (ता. सातारा) येथे वीज गेल्याचा फायदा उठवून चोरट्यांनी सुमारे नऊ लाख रुपये किमतीच्या 30 तोळे सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला. जयवंत महादेव साबळे (रा. शिवथर) यांच्या घरी ही चोरी झाली. त्यांचे गावात दुमजली घर आहे. काल रात्री जेवणानंतर सर्व जण झोपी गेले. पहाटे दोन ते सहा या कालावधीत वीज गेली होती. या संधीचा फायदा घेत चोरट्यांनी जयवंत यांच्या घरातील सोन्याचे दागिने असलेली तिजोरी लंपास केली. त्यामध्ये सोन्याचे गंठन, मोहनमाळ, अंगठ्या, सोन्याची साखळी, फुले असे सुमारे नऊ लाख रुपयांचे दागिने होते. तिजोरी असलेल्या खोलीत रात्री कोणी झोपायला नव्हते.

शिवथर - शिवथर (ता. सातारा) येथे वीज गेल्याचा फायदा उठवून चोरट्यांनी सुमारे नऊ लाख रुपये किमतीच्या 30 तोळे सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला. जयवंत महादेव साबळे (रा. शिवथर) यांच्या घरी ही चोरी झाली. त्यांचे गावात दुमजली घर आहे. काल रात्री जेवणानंतर सर्व जण झोपी गेले. पहाटे दोन ते सहा या कालावधीत वीज गेली होती. या संधीचा फायदा घेत चोरट्यांनी जयवंत यांच्या घरातील सोन्याचे दागिने असलेली तिजोरी लंपास केली. त्यामध्ये सोन्याचे गंठन, मोहनमाळ, अंगठ्या, सोन्याची साखळी, फुले असे सुमारे नऊ लाख रुपयांचे दागिने होते. तिजोरी असलेल्या खोलीत रात्री कोणी झोपायला नव्हते. आज सकाळी घरातील लोक तेथे गेल्यावर चोरी झाल्याचे निदर्शनास आले. याबाबत त्यांनी तातडीने तालुका पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर तालुका पोलिसांचे पथक गावात दाखल झाले. श्‍वान व ठसे तज्ज्ञांचे पथक बोलावण्यात आले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. 

Web Title: theft in satara

टॅग्स