सिग्नल यंत्रणा बिघडवून दोन रेल्वेगाड्यांत चोरी? 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 ऑगस्ट 2018

लोणंद- मिरज  - कुर्ला- हुबळी एक्‍स्प्रेस आणि कोल्हापूर- मुंबई सह्याद्री एक्‍स्प्रेसमध्ये चोरीचे प्रयत्न झाले. आज पहाटे अडीच ते तीनच्या सुमारास आदर्की स्थानकाजवळ सालपेनजीक हा प्रकार घडला. या संदर्भात मिरज रेल्वे पोलिस ठाण्यात कोणीही तक्रार दिलेली नाही. 

लोणंद- मिरज  - कुर्ला- हुबळी एक्‍स्प्रेस आणि कोल्हापूर- मुंबई सह्याद्री एक्‍स्प्रेसमध्ये चोरीचे प्रयत्न झाले. आज पहाटे अडीच ते तीनच्या सुमारास आदर्की स्थानकाजवळ सालपेनजीक हा प्रकार घडला. या संदर्भात मिरज रेल्वे पोलिस ठाण्यात कोणीही तक्रार दिलेली नाही. 

सहायक पोलिस निरीक्षक समाधान पवार यांनी सांगितले, की पहाटे अडीचला सालप्याजवळ अज्ञातांनी सिग्नलचा बॉक्‍स फोडून टाकला. कुर्ल्याहून हुबळीला निघालेली एक्‍स्प्रेस पहाटे दोन वाजून पाच मिनिटांनी लोणंदहून निघाली. तांबवे ते सालपेदरम्यानच्या सिग्नलमध्ये बिघाड करण्यात आला होता. एक्‍स्प्रेसला त्यामुळे हिरवा सिग्नल मिळाला नाही. चालकाने गाडी थांबवली. सालपे स्थानकावरील रेल्वे पोलिस व सुरक्षा दलाला त्याने कल्पनाही दिली. त्यांच्याबरोबर नीरा येथील रेल्वे कर्मचाऱ्यांचे पथक आले. त्यांनी सिग्नल यंत्रणेची पाहणी केली. अज्ञातांनी सिग्नलचा बॉक्‍स फोडून टाकला होता; तारा तोडल्या होत्या. यंत्रणा दुरुस्त केल्यानंतर 20 मिनिटांच्या विलंबाने एक्‍स्प्रेस मार्गस्थ झाली. रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. 

काही प्रवाशांचे साहित्य चोरीस 
रेल्वे थांबली असताना काही प्रवाशांचे साहित्य चोरीस गेल्याचे सांगण्यात आले; पण याबाबत तक्रार आली नसल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. त्याचवेळी सह्याद्री एक्‍स्प्रेस मुंबईकडे निघाली होती. त्यातील काही प्रवाशांचे साहित्यही चोरीस गेल्याची माहिती मिळाली. हुबळी गाडीतील प्रवासी तासगाव तालुक्‍यातील होते. मात्र, त्यांनी फिर्याद दिली नाही, असे रेल्वे पोलिसांचे म्हणणे आहे. 

Web Title: Theft in two trains by spoiling the signal system